TRENDING:

मुंबई-पुणे प्रवास आता सुसाट, 'खंडाळा घाट' टाळता येणार, प्रवासाचा वेळ वाचणार, गेमचेंजर प्लॅन काय?

Last Updated:

आता मुंबईहून पुण्याकडे जाताना लागणारा खंडाळा घाट टाळता येणार आहे. महत्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: मुंबई–पुणे एक्सप्रेस-वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत होता. तासन्‌तास वाहने एका ठिकाणी अडकून पडत होती, कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागत होता. मात्र, आता या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. कारण एक्सप्रेस-वे मार्गे मुंबईहून पुण्याकडे जाताना खंडाळा घाट टाळता येणार आहे. महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हा नवा मार्ग तयार झाल्यानंतर लोणावळा–खंडाळा घाटातून जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होणार आहे.
मुंबई–पुणे प्रवास आता सुसाट; खंडाळा घाट टाळता येणार, 30 मिनिटांचा वेळ वाचणार, पाहा कसा आहे नवा हायवे
मुंबई–पुणे प्रवास आता सुसाट; खंडाळा घाट टाळता येणार, 30 मिनिटांचा वेळ वाचणार, पाहा कसा आहे नवा हायवे
advertisement

बोगद्यांचे 98 टक्के काम पूर्ण, लवकरच नवा मार्ग खुला

या प्रकल्पाअंतर्गत सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सुमारे 180 मीटर उंचीचा केबल-स्टेड पूल उभारण्यात येत आहे. डोंगराळ भागात सुरू असलेला प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात आव्हानात्मक मानला जातोय. या पुलासह बोगदे पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते पुणे हे अंतर सुमारे 6 किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा किमान अर्धा तास वेळ वाचणार आहे.

advertisement

पुण्यातील ट्रॅफिकवर 'अंडरग्राउंड' तोडगा! येरवडा-कात्रज बोगद्यामुळे प्रवासाचा वेळ अर्धा; प्लॅनबाबत मोठी अपडेट

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्यांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यान या मार्गावर दोन मोठे बोगदे आहेत. यातील एक बोगदा सुमारे 8.87 किलोमीटर लांबीचा असून दुसरा बोगदा सुमारे 1.67 किलोमीटर लांबीचा आहे. या दोन्ही बोगद्यांचे सुमारे 98 टक्के काम पूर्ण झाले असून सध्या शेवटची कामे सुरू आहेत. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर लोणावळ्यात जायचे असल्यासच जुन्या घाटमार्गाचा वापर करावा लागणार आहे. इतर सर्व प्रवासासाठी मुंबई–पुणे मार्गावर थेट आणि जलद प्रवास करता येणार आहे.

advertisement

काय आहेत प्रकल्पाची वैशिष्ट्ये?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांच्या पदरी निराशा, सोयाबीन दर घसरले,तूर आणि कांद्याला काय मिळाला भाव?
सर्व पहा

मिसिंग लिंक प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे 14 किलोमीटर आहे. या मार्गावर दोन मोठे बोगदे उभारण्यात आले आहेत, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक जलद होईल. या नव्या मार्गामुळे मुंबई–पुणे प्रवासाचा वेळ सुमारे 30 मिनिटांनी कमी होणार आहे. सध्या बोगद्यांचे अंदाजे 98 टक्के काम पूर्ण झाले असून फक्त अंतिम टप्प्यातील कामे शिल्लक आहेत.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
मुंबई-पुणे प्रवास आता सुसाट, 'खंडाळा घाट' टाळता येणार, प्रवासाचा वेळ वाचणार, गेमचेंजर प्लॅन काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल