TRENDING:

मकर संक्रांतीला चुकूनही करू नका 'या' वस्तू दान, नाहीतर शनिदेव होतील नाराज; सोसावे लागतील हाल

Last Updated:
मकर संक्रांत हा सण दानधर्मासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी केलेले दान 100 पटीने फळ देते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार, काही अशा वस्तू आहेत ज्यांचे दान केल्याने शनीदेव आणि सूर्यदेव नाराज होऊ शकतात.
advertisement
1/7
मकर संक्रांतीला चुकूनही करू नका 'या' वस्तू दान, नाहीतर शनिदेव होतील नाराज
मकर संक्रांत हा सण दानधर्मासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी केलेले दान 100 पटीने फळ देते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार, काही अशा वस्तू आहेत ज्यांचे दान केल्याने शनीदेव आणि सूर्यदेव नाराज होऊ शकतात. चुकीच्या वस्तूंचे दान तुमच्या आयुष्यात प्रगतीऐवजी अडचणी निर्माण करू शकते.
advertisement
2/7
वापरलेले किंवा जुने कपडे: अनेक लोक सणानिमित्त घरातील जुने कपडे गरिबांना देतात. मात्र, संक्रांतीच्या दिवशी वापरलेले, फाटलेले किंवा मळलेले कपडे दान करणे अत्यंत अशुभ मानले जाते. यामुळे तुमच्या घरातील 'लक्ष्मी' निघून जाते आणि दारिद्र्य येते. दान नेहमी नवीन आणि कोऱ्या वस्त्रांचेच करावे.
advertisement
3/7
वापरलेले तेल: मकर संक्रांतीला तेलाचे दान शनी दोषापासून मुक्ती देते, पण ते तेल शुद्ध आणि न वापरलेले असावे. जर तुम्ही घरात एकदा वापरलेले तेल दान केले, तर शनीदेव प्रचंड संतप्त होतात. यामुळे तुमच्या कामात अडथळे येऊन आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
advertisement
4/7
प्लास्टिक आणि काचेच्या वस्तू: वास्तुशास्त्रानुसार, संक्रांतीच्या दिवशी प्लास्टिक, काच किंवा अल्युमिनियमच्या वस्तूंचे दान करणे टाळावे. या वस्तू राहु आणि शनीशी संबंधित मानल्या जातात. त्यांचे दान केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि कुटुंबात विनाकारण कटकटी सुरू होतात.
advertisement
5/7
तीक्ष्ण किंवा धारदार वस्तू: मकर संक्रांतीला चाकू, कात्री, सुरी किंवा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तूंचे दान किंवा 'वाण' म्हणून वाटप करू नका. यामुळे नात्यांमध्ये तडे जातात आणि घरात क्लेश निर्माण होतात. सुवासिनींनी वाण लुटताना देखील या गोष्टी टाळणे हिताचे असते.
advertisement
6/7
काळ्या रंगाचे कपडे: मकर संक्रांतीला काळा रंग परिधान करणे शुभ असले तरी, काळ्या कपड्यांचे दान करणे टाळावे. त्याऐवजी पिवळ्या किंवा लाल वस्त्रांचे दान करावे.
advertisement
7/7
तांदूळ: यंदा संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी असल्याने, 14 जानेवारीला तांदूळ किंवा खिचडी दान करणे टाळावे. त्याऐवजी 15 जानेवारीला दान करावे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
मकर संक्रांतीला चुकूनही करू नका 'या' वस्तू दान, नाहीतर शनिदेव होतील नाराज; सोसावे लागतील हाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल