TRENDING:

मकर संक्रांतीला केल्यात 'या' चुका तर होईल नुकसान, सुख-समृद्धी आणि वर्षभर भरभराटीसाठी काय टाळावं?

Last Updated:
हिंदू धर्मात मकर संक्रांतीला सूर्यदेवाच्या पूजेचा आणि दानाचा महापर्व मानले जाते. 14 जानेवारी 2026 रोजी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करणार असून या दिवसापासून 'उत्तरायण' सुरू होणार आहे.
advertisement
1/7
मकर संक्रांतीला केल्यात 'या' चुका तर होईल नुकसान, सुख-समृद्धीसाठी काय टाळावं?
हिंदू धर्मात मकर संक्रांतीला सूर्यदेवाच्या पूजेचा आणि दानाचा महापर्व मानले जाते. 14 जानेवारी 2026 रोजी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करणार असून या दिवसापासून 'उत्तरायण' सुरू होणार आहे. ज्योतिषांच्या मते, हा काळ ऊर्जा बदलाचा असतो. जर या शुभ दिवशी आपण नकळत काही चुका केल्या, तर वर्षभर आर्थिक चणचण, कौटुंबिक कलह आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
advertisement
2/7
राग, वाद आणि अपशब्द टाळा: मकर संक्रांत हा गोडवा पसरवण्याचा सण आहे. "तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला" ही परंपरा केवळ शब्दांपुरती मर्यादित नाही. या दिवशी घरातील सदस्यांशी किंवा बाहेर कोणाशीही वाद घालू नका. रागामुळे सूर्यदोष वाढतो आणि घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
advertisement
3/7
दान न करता जेवण करणे: संक्रांतीला दानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी दारात आलेल्या कोणत्याही गरजूला रिकाम्या हाती पाठवू नका. तीळ, गूळ, धान्य किंवा गरम वस्त्रांचे दान केल्याशिवाय स्वतः अन्न ग्रहण करू नये, असे शास्त्र सांगते. दान टाळल्यास पुण्याचे फळ मिळत नाही.
advertisement
4/7
केस आणि नखे कापणे टाळा: हिंदू संस्कृतीत सण-उत्सवाच्या दिवशी केस किंवा नखे कापणे अशुभ मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी ही कृत्ये केल्याने शरीरातील ऊर्जा कमी होते आणि वास्तुदोष निर्माण होतो. यामुळे प्रगतीत अडथळे येऊ शकतात.
advertisement
5/7
तामसिक पदार्थांचे सेवन: हा दिवस सूर्याच्या उपासनेचा आणि सात्त्विकतेचा आहे. त्यामुळे मकर संक्रांतीला मांस, मद्य, तंबाखू, लसूण आणि कांदा यांसारख्या तामसिक गोष्टींपासून दूर राहावे. या दिवशी 'खिचडी' खाणे आणि दानाचा नैवेद्य दाखवणे अत्यंत शुभ मानले जाते.
advertisement
6/7
पिवळ्या रंगाचा वापर: पंचांगानुसार, यंदाची संक्रांत पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येत आहे. त्यामुळे सुवासिनी महिलांनी आणि पुरुषांनी शक्यतो या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे, साडी किंवा वाण देणे टाळावे. त्याऐवजी काळा, लाल किंवा हिरवा रंग वापरणे शुभ ठरेल.
advertisement
7/7
निसर्गाला हानी पोहोचवणे: मकर संक्रांत हा निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे. या दिवशी झाडे तोडणे, फुले उपटणे किंवा प्राण्यांना त्रास देणे टाळावे. घराच्या परिसरात स्वच्छता ठेवावी, जेणेकरून लक्ष्मीचा वास राहील. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
मकर संक्रांतीला केल्यात 'या' चुका तर होईल नुकसान, सुख-समृद्धी आणि वर्षभर भरभराटीसाठी काय टाळावं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल