अभिनेत्रीच्या कंबरेत टाकला हात, दुसऱ्या बायकोनं केला तुफान राडा; भाजप नेता थेट तिसरं लग्न करून आला?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
भर कार्यक्रमात अभिनेत्रीच्या कंबरेत हात घालणारा तो अभिनेता आणि भाजप नेत्याने थेट तिसरं लग्न केल्याची माहिती समोर येत आहे. काय आहे नेमकं प्रकरण?
advertisement
1/8

कधी कधी एंटरटेनमेन्ट इंडस्ट्री इतकी विचित्र वाटते की इथे कोणता कलाकार कधी काय करेल हे सांगता येत नाही. नुकताच भाजप पक्षात गेलेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्यानं तिसरं लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्याची पहिली बायको मृत्यू पावली. दुसऱ्या बायकोला अजून डिवोर्स दिलेला नाही.
advertisement
2/8
अभिनेत्याच्या अफेअर्सची आणि अश्लिल वर्तवणूकीची मोठी लिस्ट आहे. काही महिन्यांआधी एका कार्यक्रमात हजारो लोकांसमोर त्याने अभिनेत्रीच्या कंबरेत हात घातला. तिच्यासोबत नको ते वर्तन केलं. अभिनेत्याचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
advertisement
3/8
अभिनेत्रीच्या कंबरेत हात घातलेल्याचा तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्याच्या दुसऱ्या बायकोनं चांगलाच राडा घातला होता. अभिनेत्याला डिवोर्स देणार नाही अशी ठाम भूमिका तिनं घेतली होती. आणि आता हा अभिनेता तिसरं लग्न करून आला अशी माहिती समोर येत आहे.
advertisement
4/8
आपण बोलत आहोत तो अभिनेता म्हणजेच, भोजपुरी स्टार आणि भाजप नेते पवन सिंह. नुकताच त्याचा 40 वा वाढदिवस झाला. या वाढदिवसाच्या पार्टीचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पवन सिंह केक कापताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये पवन सिंह यांच्या नवीन गाण्यातील डान्सर दिसत आहेत.
advertisement
5/8
व्हिडिओमध्ये पवन सिंह दारूच्या नशेत आहे. एक महिला त्यांना केक कापण्यास मदत करतानाही दिसत आहे. व्हिडिओमधील महिलेच्या भांगात कुंकू भरलेलं दिसत आहे. तिला नव्या नवरीच्या अवतारात पाहून पवन सिंहने तिसरं लग्न केल्याच्या चर्चा सुरू झाल्यात.
advertisement
6/8
व्हायरल व्हिडिओमध्ये पवन सिंगसोबत दिसणारी महिला भोजपुरी अभिनेत्री महिमा सिंग आहे. महिमा सिंग ही मूळची उत्तर प्रदेशातील बांदा येथील रहिवासी आहे. सध्या ती पवन सिंगसोबत चित्रपट आणि म्युझिक अल्बमवर काम करत आहे. त्यांचं 'बानी लाइका' हे नवीन गाणं नुकतंच रिलीज झालं आहे.
advertisement
7/8
पवन सिंहच्या बर्थडेला महिमाने दोघांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर केले होते. मात्र आता ते डिलिट करण्यात आलेत. त्याचप्रमाणे तिने तिचं नाव सिंह महिमा असं ठेवलं आहे. तिच्या उरलेल्या पोस्टही पवन सिंहसाठी असल्याचं दिसत आहे. म्हणजेच नक्कीच दोघांनी लग्न केलं असावं असा अंदाज बांधला जात आहे. पवन सिंहकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
advertisement
8/8
पवन सिंह यांच्या पहिल्या पत्नीचं आजारपणामुळे निधन झालं. त्यानंतर त्याने ज्योती सिंहशी दुसरं लग्न केलं. पण त्याचं तेही लग्न टिकलं नाही. लग्न झालेलं असताना पवन सिंहचं अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर असल्याचं बोललं जात. पवन सिंहची दुसरी बायको त्यांचं लग्न वाचवण्याचा प्रयत्न करतेय. दोघांची डिवोर्स केस कोर्टात सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अभिनेत्रीच्या कंबरेत टाकला हात, दुसऱ्या बायकोनं केला तुफान राडा; भाजप नेता थेट तिसरं लग्न करून आला?