TRENDING:

Diwali 2023 : दिवाळीची स्वच्छता करताना या गोष्टी सापडल्या तर व्हाल सुखी, चमकेल तुमचे नशीब

Last Updated:
दिवाळी जवळ आली की लोक घर स्वच्छ करतात. यावेळी साफसफाई करताना आपल्याला घरातील अनेक अशा वस्तू सापडतात, ज्या चुकून कुठेतरी पडलेल्या असतात. मात्र आपल्याला ठाऊक नसते. या गोष्टींमध्ये काही गोष्टी अशा आहेत, ज्या सापडणे शुभ मानले जाते. चला पाहूया या वस्तू कोणत्या आहेत.
advertisement
1/7
दिवाळीची स्वच्छता करताना या गोष्टी सापडल्या तर व्हाल सुखी, चमकेल तुमचे नशीब
असे मानले जाते की ज्या घरात स्वच्छता चांगली असते तिथे मां लक्ष्मी येते. त्यामुळे दिवाळीत प्रत्येकजण घराची साफसफाई करतो. दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते आणि ती तिथेच राहते जिथे स्वच्छता असते.
advertisement
2/7
दिवाळीसाठी आपण सर्वांनी घरांची साफसफाई, सजावट, खरेदी आदी कामे सुरू केली आहेत. हिंदू धर्मात दिवाळी सफाईच्या वेळी काही गोष्टी अनपेक्षितपणे सापडणे भाग्यवान मानले जाते. त्यासोबत तुमचे नशीबही चमकू शकते.
advertisement
3/7
मोरपंख किंवा बासरी सापडणे : साफसफाई करताना अचानक मोराचे पंख किंवा बासरी सापडणे खूप शुभ मानले जाते. हे तुमच्यावर देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यात लवकरच काहीतरी चांगले घडणार आहे.
advertisement
4/7
जुना तांदूळ सापडणे : जर तुम्ही तांदूळ कुठेतरी ठेवायला विसरला असाल आणि साफ करताना अचानक सापडला तर ज्योतिष शास्त्रात ते शुभ मानले जाते.
advertisement
5/7
लाल कपडा : घराच्या साफसफाईच्या वेळी घराच्या कोणत्याही कोपऱ्यात कोरे लाल कापड दिसले तर ते तुमच्या आयुष्यातील सोनेरी काळाच्या सुरुवातीचे लक्षण आहे.
advertisement
6/7
अचानक पैसे मिळणे : दिवाळीच्या साफसफाईच्या वेळी अचानक घराच्या कोपऱ्यात नोटा किंवा नाणी दिसली, जी तुम्ही ठेवल्याची तुम्हाला आठवत नसेल. तर ते खूप शुभ आहे. हे पैसे मंदिरात दान करा, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल.
advertisement
7/7
शंख : स्वच्छता करताना शंख सापडणेदेखील शुभ मानले जाते. या आहेत माता लक्ष्मीच्या आवडत्या गोष्टी. या सापडल्यामुळे संपत्ती मिळण्याची दाट शक्यता निर्माण होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Diwali 2023 : दिवाळीची स्वच्छता करताना या गोष्टी सापडल्या तर व्हाल सुखी, चमकेल तुमचे नशीब
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल