गावात आजही शेणाने का सारवले जाते, काय आहे यामागचे वैज्ञानिक अन् धार्मिक कारण?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
बदलत्या जीवनशैलीमुळे आधीच्या तुलनेत आता आरसीसीची घरे बांधली जात आहे. बंगले, इमारती बांधल्या जात आहेत. मात्र, ग्रामीण भागात आजही काही ठिकाणी मातीची घरे आढळतात. त्यामध्ये शेणाने घरात सारवले जाते. मात्र, यामागचे वैज्ञानिक किंवा धार्मिक कारण काय आहे, हेच आपण आज जाणून घेऊयात. (सावन/खंडवा, प्रतिनिधी)
advertisement
1/5

खंडव्यासह निमाडच्या ग्रामीण परिसरात आजही घरातील भिंतीवर तसेच खाली जमिनीवर गायीच्या शेणाने सारवले जाते. गायीचे शेण घराला शुद्ध करते आणि हा भारतीय गावांमधील स्वच्छतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. गावात विंचू तसेच इतर कीटकांपासून बचावासाठीही शेणाचा वापर केला जातो. ज्याठिकाणी शेणाने सारवलेले असते. त्याठिकाणी हे कीटक येत नाही.
advertisement
2/5
आनंदपुर खेगाव येथील रहिवासी भगीरथ पटेल यांनी याबाबत लोकल18ला सांगितले. ते म्हणाले की, गायीच्या शेणात नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशिअम आणि लोह तत्त्व असतात. गायीच्या शेणापासून बनलेल्या हवनातून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निघतो. हा ऑक्सिजन वातावरणाला शुद्ध करण्यास मदत करतो.
advertisement
3/5
वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्टिकोणातूनही शेणाचे विशेष महत्त्व आहे. शास्त्रांनुसार, गायीच्या शेणात लक्ष्मी मातेचा वास असतो. त्यामुळे घरात सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी तिचा उपयोग केला जातो. त्यात पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे आजही खेड्यापाड्यात, शेणाचा वापर केवळ घरांमध्येच नाही तर शेतातही केला जातो.
advertisement
4/5
यामध्ये 3% नायट्रोजन, 2% फॉस्फरस आणि 1% पोटॅशियम असते. यामुळे जैविक दृष्ट्या शेतात पोषक तत्वांचा समतोल राखण्यासाठी मदत होते. हिंदू धर्मात गायीला गोमातेचा दर्जा आहे. तसेच गायीच्या शेणाला आणि गोमुत्राला पवित्र मानले गेले आहे. घराचे वातावरण शुद्ध आणि पवित्र राहावे यासाठी भारतातील अनेक गावांमध्ये, सण-उत्सवांदरम्यान, घराची साफसफाई केल्यानंतर शेणाने सारवले जाते.
advertisement
5/5
सूचना : ही माहिती राशिचक्र, धर्म आणि शास्त्राच्या आधारे ज्योतिषी आणि आचार्यांशी केलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. याबाबत लोकल-18 कोणताही दावा करत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
गावात आजही शेणाने का सारवले जाते, काय आहे यामागचे वैज्ञानिक अन् धार्मिक कारण?