हुश्श...फक्त काहीच दिवस, शनी बदलणार चाल, 3 राशींचा सुवर्णकाळ, आता संकटं सरणार!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Shani Astrology: पत्रिकेतल्या ग्रहांच्या स्थितीवर व्यक्तीचं सुख, दु:ख अवलंबून असतं, असं ज्योतिषशास्त्र सांगतं आणि ग्रह, तारे वेळोवेळी आपली चाल, स्थिती बदलत असतात. आता लवकरच शनी ग्रह सरळ मार्गी चालणार आहे. याचा काही राशींच्या व्यक्तींना बक्कळ फायदा होईल. शनीकृपेनं त्यांना आयुष्यात कधीच अनुभवलं नसेल एवढं सुख अनुभवायला मिळेल, असं ज्योतिषांनी सांगितलं आहे. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
1/5

मेष राशीच्या व्यक्तींना शनीचा विशेष आशीर्वाद मिळेल. करियरमध्ये मनासारखं घडेल, व्यवसाय विस्तारेल, नोकरीत यशस्वी व्हाल, आर्थिक स्थिती भक्कम होईल, वैवाहिक जिवनात सुख येईल.
advertisement
2/5
शनीच्या सरळ चालीचा तूळ राशीच्या व्यक्तींनाही भरपूर फायदा होईल. रखडलेली सर्व कामं मार्गी लागतील. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल. नोकरीत प्रमोशन मिळू शकतं, पगारवाढ होऊ शकते. व्यवसायातही मनासारखा नफा मिळू शकतो.
advertisement
3/5
शनी सरळमार्गी होताच धनू राशीच्या व्यक्तींवर त्याची अतिशय कृपा होईल. या व्यक्तींची करियरमध्ये विशेष प्रगती होऊ शकते. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त अशी स्थिती असल्यानं उत्तम बचत होईल. मन प्रसन्न राहिल. नोकरीच्या शोधात असाल तर आता मनासारखी संधी मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये यश येऊ शकतं.
advertisement
4/5
झारखंडमधील देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं, 'शनी ग्रह सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. याच राशीत शनीची उलट चाल सुरू झाली होती. आता येत्या 15 नोव्हेंबरला शनी याच राशीत सरळमार्गी चालेल. शनीच्या या सरळ चालीचा वरील 3 राशींच्या व्यक्तींना भरभरून फायदा होईल. शनी सरळमार्गी होताच या व्यक्तींच्या आयुष्यात सुख यायला सुरुवात होईल.'
advertisement
5/5
सूचना: इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
हुश्श...फक्त काहीच दिवस, शनी बदलणार चाल, 3 राशींचा सुवर्णकाळ, आता संकटं सरणार!