Kuber Mantra : 'या' कुबेर मंत्राने तुमच्याकडे आकर्षित होईल पैसा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Kuber Mantra Benefits In Marathi : धन-धान्य, समृद्धी आणि पैसा याची देवता म्हणजे कुबेर, आपल्या घरात भरभरात कायम राहावी यासाठी कुबेर देवाची आराधना न विसरता करणं आवश्यक आहे. तुम्हाला पैसा आकर्षित करायचा असेल तर ही आराधना कशी करायची सोप्या शब्दात समजून घ्या.
advertisement
1/8

Kuber Mantra : हिंदू धर्मात आणि आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या परंपरेनुसार कुबेरला खूप महत्त्व आहे. कुबेर म्हणजे धनाची देवता. कुबेराचा अपमान म्हणजे धनाचा अपमान. कुबेर देवाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याकडे पैसा आणि समृद्धी कायम टिकून राहण्यासाठी कायम कुबेर देवाचं नामस्मरण करावं असं सांगितलं जातं.
advertisement
2/8
तुम्ही योग्य पद्धतीनं कुबेराची सेवा केली तर त्याची योग्य ती फलप्राप्ती होते असं सांगितलं जातं. कुबेराची कृपा कायम राहते. मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुमची श्रद्धा.
advertisement
3/8
तुम्ही पूर्ण मनोभावे आणि श्रद्धेनं हा जप करणं आवश्यक आहे. यासाठी काही नियम देखील पाळावे लागतात. कुबेर देव प्रसन्न झाला तर आपल्या घरातील बरकत कायम राहाते. धनधान्य, पैसा, समृद्धी कायम राहाते.
advertisement
4/8
कुबेर मंत्र : ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये| धनधान्यसमृद्धिं मे देहि दापय स्वाहा॥ हा मंत्र धान्य धान्य आणि समृद्धी कायम टिकून राहावी म्हणून म्हटला जातो. या मंत्राचा 108 वेळा जप करावा.
advertisement
5/8
ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः॥ जर एखाद्या व्यक्तीने दररोज कुबेर मंत्राचा जप केला तर ती व्यक्ती धनहानी टाळू शकते. याशिवाय व्यवसायात आणि नोकरीत नफा मिळतो. कुबेर देवाच्या कृपेने साधकाला उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतात आणि त्याच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा दिसून येते.
advertisement
6/8
कुबेर मंत्राचा जप करण्याचे काही नियम सांगितले आहेत. या मंत्राचा जप एक दोन दिवस नाही तर नित्यनियमाने किमान 3 महिने तरी करायला हवा. या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. यासाठी दररोज सकाळी स्नान करून कुबेरजींच्या मूर्तीची पूजा करावी. त्यानंतर एका मुद्रेत बसून या मंत्राचा जप करा. या काळात तुमचे मन शुद्ध असावे आणि मंत्राचा उच्चार योग्य असावा हे लक्षात ठेवा. तरच तुम्हाला या मंत्राचे फायदे मिळू शकतात.
advertisement
7/8
काळजी काय घ्यावी? - या मंत्राचा जप करताना तुम्ही स्वच्छ कपडे घालून शुद्ध मनाने तो करावा. यावेळी बसताना तुमचं तोंड दक्षिण दिशेकडे नसावे. मन एकाग्र नसेल तर याचा तुम्हाला फायदा होणार नाही.
advertisement
8/8
इथे दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज18 मराठी या माहितीची कोणतीही खातरजमा करत नाही. या माहितीमधून कोणतीही अंद्धश्रद्धा पसरवण्याचा न्यूज18 मराठीचा हेतू नाही.