TRENDING:

रामनवमीला हे दृश्य चूकवू नका! श्रीरामांच्या कपाळावर लागणार सूर्यकिरणांचा टिळा

Last Updated:
17 एप्रिलला सर्वत्र धुमधडाक्यात रामनवमी साजरी होईल. अयोध्येतील भव्य राम मंदिरात दुपारी 12:00 वाजता राम जन्मोत्सव साजरा केला जाईल. यावेळी श्रीरामांच्या माथ्यावर चक्क सूर्यकिरणांचा टिळा लागेल. हे अद्भुत दृश्य संपूर्ण जगाला पाहता येईल. (सर्वेश श्रीवास्तव / अयोध्या)
advertisement
1/5
रामनवमीला हे दृश्य चूकवू नका! श्रीरामांच्या कपाळावर लागणार सूर्यकिरणांचा टिळा
22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. त्यानंतर साजरी होणारी ही पहिली रामनवमी खास असणार यात काही शंका नाही. या दिवशी श्रीरामांच्या माथ्यावर सूर्यकिरणं पाडण्याची जबाबदारी उत्तराखंडमधील आयआयटी रुडकीच्या शास्त्रज्ञांनी स्वीकारली आहे. 
advertisement
2/5
आरश्याच्या माध्यमातून सूर्यकिरणं श्रीरामांच्या माथ्यापर्यंत पोहोचवण्यात येतील. हा प्रयोग यशस्वी झाला असून आता तो रामनवमीला सर्वांना पाहता येईल.
advertisement
3/5
रामनवमीच्या दिवशी राम मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरील एका आरश्यावर सूर्याची किरणं पडतील. ती परावर्तित होऊन एका पितळेच्या पाईपमध्ये जातील. या पाईपमध्ये असलेल्या एका आरश्यावर किरणं परावर्तित होऊन 90 डिग्रीवर पुनर्परावर्तित होतील. त्यानंतर पितळेच्या पाईपमधून किरणं 3 वेगवेगळ्या लेंसमधून जातील. मग पाईपच्या टोकाला मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या एका आरश्यावर किरणं पडून थेट श्रीरामांच्या मुखावर दिसतील. 
advertisement
4/5
श्रीरामांच्या माथ्यावर सूर्यकिरणांचा एक लहान गोल तयार होईल. रामनवमीला दुपारी 12 वाजता हा सूर्यकिरणांचा टिळा पाहता येईल. श्री राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी या प्रयोगाबाबत शास्त्रज्ञांचं कौतुक केलंय.
advertisement
5/5
रामनवमीनिमित्त राम मंदिर आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात येणार आहे. शिवाय या दिवशी असंख्य भाविक श्रीरामांच्या दर्शनासाठी दाखल होतील असा अंदाज असल्याने दर्शनाची वेळही वाढवण्यात येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
रामनवमीला हे दृश्य चूकवू नका! श्रीरामांच्या कपाळावर लागणार सूर्यकिरणांचा टिळा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल