TRENDING:

तब्बल 100 वर्षांनी दुर्मीळ योग, 'या' 3 राशींच्या व्यक्ती आता दारातूनच परतवून लावतील अडचणी!

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 हे संपूर्ण वर्ष ग्रह, ताऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत संपन्न आहे. या वर्षात चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण एकाच महिन्यात (मार्च 2025) लागण्याचा अनोखा योग जुळून आला. विशेष म्हणजे ज्या दिवशी सूर्यग्रहण लागलं त्याच दिवशी शनी रास बदलणार आहे. शनी ग्रह तब्बल अडीच वर्षांनी आपली रास बदलतो. 29 मार्च रोजी शनी राशीपरिवर्तन आणि सूर्यग्रहण हा दुर्मीळ योग तब्बल 100 वर्षांनी जुळून आला आहे. ज्याचा भरभरून फायदा 3 राशींच्या व्यक्तींना होणार आहे. त्यांच्यासाठी प्रगतीचा काळ आता सुरू होतोय, असं प्रसिद्ध ज्योतिषांनी सांगितलं आहे. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
1/5
तब्बल 100 वर्षांनी दुर्मीळ योग, 3 राशींच्या व्यक्ती दारातूनच परतवून लावतील अडचणी
मिथुन : या राशीच्या व्यक्तींसाठी हा दुर्मीळ योग अतिशय खास ठरेल. शनीचं राशीपरिवर्तन आणि सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे आर्थिक प्रगतीचा योग जुळून येईल. आत्मविश्वास कमालीचा वाढेल. रखडलेली कामं मार्गी लागतील. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. पगारवाढही होईल.
advertisement
2/5
कर्क : या राशीच्या व्यक्तींसाठी हा दुर्मीळ योग भाग्याचा ठरेल. जमीन, घर किंवा गाडी खरेदीचा योग आहे. कामानिमित्त परदेशी प्रवास होण्याची शक्यता आहे. कामकाज विस्तारेल. आई-बाबा होऊ इच्छिणाऱ्या दाम्पत्याला गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न दुप्पट वाढेल. नोकरीच्या शोधात असाल तर आता मनासारखी संधी मिळेल.
advertisement
3/5
मकर : या राशीच्या व्यक्तींवर शनीचा शुभ प्रभाव पडेल. कामकाजात मान-सन्मान वाढेल. आरोग्यही उत्तम साथ देईल. व्यवसायात नफा होईल. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये निकाल आपल्या बाजूनं लागेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळेल. व्यवसायात मोठा व्यवहार होऊ शकतो.
advertisement
4/5
देवघरमधील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी ही सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, वरील 3 राशींच्या व्यक्तींवर शनीची भरभरून कृपा असेल, परंतु प्रत्येक व्यक्तीचं सुख, दु:ख हे तिच्या पत्रिकेतील सर्व ग्रहांच्या हालचालींवर अवलंबून असतं. कदाचित इतर ग्रहांमुळे अडचणीही वाट्याला येऊ शकतील, परंतु शनीच्या आशीर्वादानं वाईट काळावर मात करण्याचं बळ मिळेल.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
तब्बल 100 वर्षांनी दुर्मीळ योग, 'या' 3 राशींच्या व्यक्ती आता दारातूनच परतवून लावतील अडचणी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल