TRENDING:

Papmochani Ekadashi 2026: पापमोचनी एकादशी दिवशी चुकूनही करू नयेत ही 5 कामे; घरावर श्रीहरीची अवकृपा

Last Updated:
Ekadashi Tips: प्रत्येक महिन्यात दोन एकादशी साजऱ्या केल्या जातात. आता गुढीपाडव्या आधी फाल्गुन महिन्यातील पापमोचनी एकादशीला विशेष स्थान आहे. नावाप्रमाणेच ही एकादशी सर्व पापांतून मुक्ती देणारी आणि श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळवून देणारी मानली जाते. मात्र, या व्रताचे काही कडक नियम आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. या दिवशी काही चुका झाल्या, तर व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही आणि दोष लागतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
1/6
पापमोचनी एकादशी दिवशी चुकूनही करू नयेत ही 5 कामे; घरावर श्रीहरीची अवकृपा
महाराष्ट्रात संकष्टी-एकादशीला कित्येक लोक उपवास करतात. पंचांगानुसार फाल्गुन कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 14 मार्च रोजी सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी सुरू होईल आणि 15 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी संपेल. उदयातिथीनुसार पापमोचनी एकादशीचे व्रत 15 मार्च रोजी धरले जाईल. व्रत सोडण्याची वेळ 16 मार्च 2026 रोजी सकाळी 6 वाजून 54 मिनिटे ते 9 वाजून 18 मिनिटे या दरम्यान असेल.
advertisement
2/6
एकादशीला कोणती कामे करणे टाळावे -तुळशीची पाने तोडू नका - तुळस ही भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे, पण एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे योग्य मानले जाते. पूजेसाठी तुळस हवी असल्यास ती एक दिवस आधीच तोडून ठेवावी किंवा जमिनीवर गळून पडलेली पाने वापरावीत. वाळलेली तुळशीची पानेही पूजेसाठी शुद्ध मानली जातात.
advertisement
3/6
राग आणि वादावादी टाळा - एकादशी हा विष्णूंचा म्हणजेच हरिचा दिवस आहे. या दिवशी कोणावरही रागवणे, कोणाबद्दल वाईट बोलणे किंवा निंदा करणे टाळावे. यामुळे तुमचे कमावलेले पुण्य नष्ट होते. पूर्ण फळ मिळण्यासाठी मन आणि वाणी दोन्ही शुद्ध ठेवणे महत्त्वाचे आहे.
advertisement
4/6
तामसिक अन्नाचा त्याग - पापमोचनी एकादशीच्या दिवशी लसूण, कांदा, मांस आणि मद्य यांसारख्या तामसिक गोष्टींचे सेवन करू नये. तुम्ही उपवास केला नसला तरी या दिवशी घरात सात्विक अन्नच खावे, जेणेकरून घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहील.
advertisement
5/6
दिवसा झोपणे टाळा - एकादशीचा दिवस हा नामस्मरण आणि भजनाचा असतो. त्यामुळे उपवास करणाऱ्याने दिवसा झोपणे टाळावे, कारण यामुळे व्रताचा प्रभाव कमी होतो. त्याऐवजी भगवद्गीता वाचणे किंवा मंत्रांचा जप करणे उत्तम ठरते.
advertisement
6/6
भात खाणे टाळा - धार्मिक मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी भात खाणे वर्जित आहे. पौराणिक कथांमध्ये भाताचा संबंध सरपटणाऱ्या जीवांशी जोडला गेला आहे. या दिवशी भात खाल्ल्याने मनातील चंचलता वाढते आणि व्रताचा सात्विक प्रभाव कमी होतो, असे मानले जाते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Papmochani Ekadashi 2026: पापमोचनी एकादशी दिवशी चुकूनही करू नयेत ही 5 कामे; घरावर श्रीहरीची अवकृपा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल