TRENDING:

Astrology: राजेशला सारखी ठेच लागायची, विद्याच्या घरात काच फुटायची; ज्योतिषशास्त्रानुसार अशा गोष्टी होणं म्हणजे..

Last Updated:
Astrology: भारतीय परंपरेत ज्योतिषाबरोबरच शकुन शास्त्रालाही विशेष महत्त्व दिले गेले आहे. मानवी जीवनात घडणाऱ्या अनेक लहानसहान घटना या केवळ योगायोग नसून त्यामागे काही संकेत दडलेले असतात, असे त्यात मानले जाते. रोजच्या कामात असताना कधी डोळा अचानक फडफडतो, कधी तळहाताला खाज सुटते किंवा भुवया आपोआप हलू लागतात. बहुतेक वेळा आपण हे थकवा, ताणतणाव किंवा शरीरातील कमतरतेमुळे होत आहे, असे मानून दुर्लक्ष करतो. मात्र प्राचीन काळापासून अशा शारीरिक हालचाली भविष्यातील घडामोडींशी जोडून पाहिल्या जातात. शकुन शास्त्रानुसार मानवी शरीर निसर्गाशी सुसंगत असून शरीरात होणारी प्रत्येक हालचाल येणाऱ्या एखाद्या परिस्थितीचा संकेत देत असते. विशेष म्हणजे हे संकेत पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळे अर्थ दर्शवतात. याविषयी ज्योतिषी पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी दिलेली माहिती जाणून घेऊ. (येथे राजेश आणि विद्या ही काल्पनिक नावे वापरली आहेत)
advertisement
1/7
राजेशला सारखी ठेच लागायची, विद्याच्या घरात काच फुटायची; ज्योतिषशास्त्र सांगतं..
शकुन शास्त्रानुसार शरीराच्या कोणत्याही अवयवाचे अचानक फडफडणे ही सर्वसाधारण गोष्ट मानली जात नाही. ते भविष्यात घडणाऱ्या एखाद्या घटनेचा संकेत समजला जातो. कोणता अवयव फडफडतो आहे आणि ती व्यक्ती पुरुष आहे की महिला, यावरून त्याचा अर्थ ठरवला जातो.
advertisement
2/7
महिलांचा उजवा डोळा फडफडणे अशुभ मानले जाते. याचा अर्थ येणारी अडचण किंवा मानसिक ताण असा घेतला जातो. तर महिलांचा डावा डोळा फडफडणे शुभ मानले गेले आहे. पुरुषांच्या बाबतीत याचा उलटा अर्थ लावला जातो. पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे लाभ आणि यशाचे संकेत देतो.
advertisement
3/7
जर महिलांची उजवी भुवई फडफडत असेल, तर ते नुकसान किंवा चिंतेशी जोडले जाते. पुरुषांची उजवी भुवई फडफडणे मान-सन्मान वाढणे आणि धनलाभ होण्याचे लक्षण मानले जाते. डाव्या भुवईचे फडफडणे सामान्य परिणाम देणारे समजले जाते.
advertisement
4/7
उजव्या तळहाताला खाज येणे हे धनलाभाचे संकेत मानले जातात. असे म्हटले जाते की लवकरच एखादी आर्थिक संधी समोर येऊ शकते. ही संधी नोकरी, व्यवसाय किंवा आधी अडकलेले पैसे मिळण्याशी संबंधित असू शकते.
advertisement
5/7
डाव्या तळहाताला खाज येणे खर्च वाढण्याकडे इशारा करते असे मानले जाते. अचानक खर्च होणे किंवा पैशांचे नियोजन बिघडण्याची शक्यता यातून व्यक्त केली जाते. अशा वेळी अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
6/7
घरात अचानक काच तुटणे अनेक लोक अशुभ मानतात, पण शकुन शास्त्रानुसार ते संकट टळल्याचे लक्षण मानले जाते. अशी धारणा आहे की एखादी मोठी अडचण तुमच्या आयुष्यातून दूर झाली आहे. तुटलेली काच घरात ठेवणे योग्य मानले जात नाही.
advertisement
7/7
एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी निघताना वारंवार पायाला ठेच लागत असेल, तर तो सावधगिरीचा संकेत मानला जातो. शकुन शास्त्रानुसार अशा वेळी महत्त्वाचे निर्णय काही काळासाठी पुढे ढकललेले बरे मानले जातात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Astrology: राजेशला सारखी ठेच लागायची, विद्याच्या घरात काच फुटायची; ज्योतिषशास्त्रानुसार अशा गोष्टी होणं म्हणजे..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल