TRENDING:

Shani Astrology: साक्षात शनीदेवांची होणार कृपा, 3 राशींच्या व्यक्तींसाठी तब्बल 2 वर्षांहून अधिक काळ सरणार सुखात!

Last Updated:
Shani Grah Gochar 2025: 'शनी साडेसाती' म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात अडचणी. परंतु ज्योतिषशास्त्र सांगतं की, जेव्हा शनीची कृपा होते, तेव्हा आयुष्य अगदी सुखात न्हाऊन निघतं. आता लवकरच शनीचा राशीप्रवेश होणार आहे. त्यानंतर तब्बल 2 वर्षांहून अधिक काळ 3 राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत सुखात सरतील, असं प्रसिद्ध ज्योतिषांनी सांगितलंय. त्यामुळे शनीची कृपा असणाऱ्या या 3 राशी नेमक्या आहेत तरी कोणत्या, जाणून घेऊया. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
1/5
शनीदेवांची होणार कृपा, 3 राशींसाठी तब्बल 2 वर्षांहून अधिक काळ सरणार सुखात!
कर्क : या राशीच्या व्यक्तींसाठी शनी गोचर अत्यंत लाभदायी ठरणार आहे. मनातल्या सर्व इच्छा हळूहळू पूर्ण होतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरीत प्रतिष्ठा वाढेल. कामकाजात लाभ होईल. मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहील.
advertisement
2/5
वृश्चिक : या राशीच्या व्यक्तींवर मारुतीरायाची विशेष कृपा असेल. त्यांच्या आशीर्वादानं बिघडलेलं सर्व कामं सुरळीत होतील. करियरमध्ये नव्या चांगल्या संधी मिळतील. गुंतवणुकीतून लाभ मिळेल. कामकाज विस्तारेल. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. इतरांकडे अडकलेले आपले हक्काचे पैसे आता परत मिळतील. शनीदेवांच्या कृपेनं नोकरीत प्रमोशनही मिळू शकतं.
advertisement
3/5
मकर : या राशीच्या व्यक्तींना शनी साडेसातीपासून मुक्ती मिळेल. अर्थात आता रखडलेली सर्व कामं मार्गी लागतील, इतरांकडे किंवा गुंतवणुकीत अडकलेले हक्काचे पैसे परत मिळतील. कामकाजात यश मिळेल. करियरमध्ये मनासारखं घडेल. नोकरीत प्रगतीचा काळ सुरू होईल.
advertisement
4/5
अयोध्येतील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी ही सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, शनी ग्रह सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. येत्या 29 मार्च रोजी शनीचा मीन राशीत प्रवेश होईल. मग 3 जून 2027 पर्यंत इथंच मुक्काम असेल. त्यानंतर त्याचा प्रवास मेष राशीकडे सुरू होईल. जोपर्यंत शनी मीन राशीत असेल, तोपर्यंत वरील 3 राशींच्या व्यक्तींसाठी दिवस अतिशय सुखद असणार आहेत. त्यांचं जणू नशीबच पालटेल, असं ज्योतिषांनी सांगितलं आहे.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Shani Astrology: साक्षात शनीदेवांची होणार कृपा, 3 राशींच्या व्यक्तींसाठी तब्बल 2 वर्षांहून अधिक काळ सरणार सुखात!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल