पुस्तक महोत्सव काळात सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर काही वेळा वाहतूक नियंत्रण व आवश्यकतेनुसार वाहने वळवण्याची तरतूद करण्यात आली आहे. या कालावधीत वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
'25 लाखात अर्धा तोळे सोनं मिळणार'; पुण्यातील महिलेनं लगेचच दिले पैसे अन् झाला गेम
advertisement
असे असणार पर्यायी मार्ग
पर्यायी मार्गांची व्यवस्था: जंगली महाराज रस्त्याने कर्वे रोडकडे जाणारी वाहने बालगंधर्व चौक, नदीपात्र रोड तसेच महादेव मंदिर मार्गे आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकतील. कर्वे रोडकडून फर्ग्युसन कॉलेज रोडने शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी कर्वे रोड नळस्टॉप, लॉ कॉलेज रोड व सेनापती बापट रोड या मार्गांचा वापर सुचविण्यात आला आहे. यामुळे मुख्य रस्त्यांवरील ताण कमी होऊन वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.
पार्किंग आणि प्रवेश
पार्किंग व प्रवेश मार्गांची माहिती: पुस्तक महोत्सवासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी एफ.सी. कॉलेज गेट क्रमांक 3 (संत तुकाराम महाराज पादुका चौक बाजू) येथून दुचाकी, चारचाकी तसेच बससह सर्व वाहनांना एफ.सी. कॉलेज पार्किंग ग्राउंडमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. बाहेर जाण्यासाठी एफ.सी. कॉलेज गेट क्रमांक 4 वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पायी येणाऱ्या नागरिकांसाठी एफ.सी. कॉलेज गेट क्रमांक 2 खुले राहणार आहे. तसेच बी.एम.सी.सी. कॉलेज आणि गेट क्रमांक 2 समोरील पुणे महानगरपालिका वाहनतळावर दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी विनाशुल्क पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.






