Astrology: तुम्हालाही अचानक रात्री 2:30 ते 4:00 वाजता जाग येते? खूप विशेष गोष्टीचा तो संकेत, काय करावं
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Sleep Breaking Sign: झोप ही माणसासाठी खूप महत्त्वाची शारीरिक क्रिया आहे. जसं चांगलं खाणं-पिणं आरोग्यासाठी गरजेचं असतं, तसंच चांगली झोपही निरोगी राहण्यासाठी अत्यावश्यक आहे. म्हणूनच डॉक्टर नेहमी ठरावीक वेळेला झोपायला आणि उठायला सांगतात. प्रत्येक वयात किती झोप लागते हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. पण बऱ्याचदा असं दिसतं की काही लोक रात्री अचानक जागे होतात. काही जण रोज अगदी त्याच वेळेला उठतात, तर काही जण रात्री काहीच कारण नसताना जागे होतात.
advertisement
1/6

विशेषतः रात्री 2, 3 किंवा 4 च्या सुमारास कोणताही अलार्म, आवाज किंवा बाहेरचा त्रास नसतानाही अचानक डोळे उघडतात. असं का होतंय, हे कळतही नाही. खरं तर ही फक्त झोपेची समस्या नसते. भारतीय संस्कृतीनुसार आणि आध्यात्मिक मान्यतांनुसार, वारंवार एकाच वेळेला जाग येणं हे आपल्या अंतर्मनाकडून मिळणारा एक नैसर्गिक संकेत असतो. शास्त्र जाणकारांच्या मते, हा संकेत नेमका काय सांगतोय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
advertisement
2/6
ज्योतिषशास्त्रानुसार, दिवसभराच्या धावपळीत आपण आपल्या मनाचा आवाज दुर्लक्षित करतो. म्हणूनच रात्री उशिरा सगळीकडे शांतता असताना आपलंच अंतर्मन आपल्याला जागं करतं. रांची येथील प्रसिद्ध ज्योतिषी संतोष कुमार चौबे सांगतात, पहाटे 3 ते 4 हा वेळ फार महत्त्वाचा असतो. यालाच ब्रह्ममुहूर्त म्हणावं. या वेळेत अनेक नैसर्गिक शक्ती आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न करतात. त्या दुर्लक्षित करू नयेत. या वेळेत काही विशेष गोष्टी करणं उपयोगाचं ठरतं.
advertisement
3/6
अशा प्रकारे जाग येण्याचा संकेत आपल्याला सांगतो की, दिवसभर मनात दडलेली, न सुटलेली एखादी गोष्ट आहे का, याकडे लक्ष द्या. एखादी भावना, एखं दुःख किंवा आयुष्यात बदल घडवायची इच्छासुद्धा असू शकते. तसेच जाग येण्याच्या वेळेला देखील खास अर्थ असतो. अर्ध्या रात्री जाग येणं म्हणजे एक टप्पा संपून नव्या टप्प्याची सुरुवात होणं. विशेषतः सकाळी 3 ते 4 हा वेळ आध्यात्मिक वेळ मानला जातो. या वेळेत भौतिक आणि आध्यात्मिक जगामधली सीमारेषा फार पातळ होते. प्रार्थना, आत्मचिंतन आणि सकारात्मक संकेतांसाठी हा वेळ खूप प्रभावी असतो. सकाळी 4 ते 5 दरम्यान जाग येणं म्हणजे तुमचं मन नव्या सुरुवातीसाठी तयार होत आहे, असा संकेत असतो.
advertisement
4/6
यामागे काही कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे जुनं दुःख किंवा आठवणी अजूनही मनात दडलेल्या असतात. दुसरं म्हणजे स्वप्नं तुम्हाला आयुष्यात योग्य दिशा दाखवायचा प्रयत्न करत असतात. तिसरं म्हणजे नकळत तुम्ही जुन्या सवयी आणि विचार सोडून देत असता. असं झाल्यावर घाबरायचं कारण नाही. ही समस्या नसून स्वतःशी संवाद साधण्याची संधी आहे. हळूहळू बसा, खोल श्वास घ्या. त्या क्षणी मनात काय विचार, भावना किंवा आठवणी येत आहेत याकडे लक्ष द्या. लगेच त्यावर निष्कर्ष काढू नका. मनात हळूच विचारू शकता, मला काय समजून घ्यायचं आहे? जवळ डायरी ठेवून जे मनात येईल ते लिहू शकता. थोडा वेळ ध्यान किंवा मंत्र म्हणाल तर मन शांत होण्यास मदत होते.
advertisement
5/6
तज्ज्ञ सांगतात की जर वारंवार एकाच वेळेला जाग येत असेल, तर गोंधळून न जाता ते शांतपणे स्वीकारा. यामुळे अंतर्मनाला समजतं की त्याचा संदेश पोहोचला आहे. हळूहळू रात्री जाग येणं कमी होतं. पण सर्वात आधी शारीरिक कारणं तपासणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळी यामागे आध्यात्मिक कारणच असतं असं नाही. ताणतणाव, जास्त कॅफिन, रक्तातील साखरेत बदल, स्लीप एपनिया किंवा औषधांचे दुष्परिणामही कारणीभूत असू शकतात. जोरात घोरणं, सतत थकवा, जास्त चिंता किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. शरीर निरोगी असेल तरच मनाचे संकेत नीट समजू शकतात.
advertisement
6/6
धर्मग्रंथांचे अभ्यासक सांगतात की, या वेळेकडे आशीर्वाद म्हणून पाहावं. रात्रीचा हा शांत वेळ म्हणजे अंतर्मनाशी जोडण्याची एक दुर्मिळ संधी आहे. या वेळेत मेणबत्ती लावू शकता, हात हृदयावर ठेवू शकता किंवा शांतपणे श्वासावर लक्ष केंद्रित करू शकता. हे छोटेसे उपाय चिंता कमी करतात आणि मनाला शांती देतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: तुम्हालाही अचानक रात्री 2:30 ते 4:00 वाजता जाग येते? खूप विशेष गोष्टीचा तो संकेत, काय करावं