Ashadhi Wari 2025: नागपूरमधलं असं गाव ज्याला म्हटलं जातं 'विदर्भाचं पंढरपूर', पण नेमकं कारण काय?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Ashadhi Ekadashi 2025: नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा हे विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. नागपूर वरून 40 किमी अंतरावर धापेवाडा हे गाव आहे. याठिकाणी विठ्ठलाची स्वयंभू मूर्ती आहे.
advertisement
1/7

आषाढ आणि कार्तिक महिन्यात वारकऱ्यांना घाई असते ती म्हणजे विठुरायाच्या दर्शनाची. तहान भूक हरवून वारकरी विठुरायाचा धावा करतात. प्रत्येकाला जमेल तसं ते विठुरायाच्या दर्शनाला जाण्याचा प्रयत्न करतात. पण, अजूनही काही भक्त असे आहेत ज्यांची पंढरपूर वारीची इच्छा अपूर्ण आहे. काही कारणास्तव त्यांना वारी घडत नाही. अशा भक्तांसाठी विदर्भातच पंढरपूर आहे.
advertisement
2/7
नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा हे विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. नागपूरपासून 40 किमी अंतरावर धापेवाडा हे गाव आहे. याठिकाणी विठ्ठलाची स्वयंभू मूर्ती आहे. या मंदिराची एक वेगळीच आख्यायिका सांगितली जाते, जाणून घेऊ त्याबाबत अधिक माहिती. विदर्भाचे पंढरपूर धापेवाडा येथील ग्रामस्थांशी लोकल18 ने संवाद साधला.
advertisement
3/7
तेव्हा ते सांगतात की, धापेवाडा म्हणजेच विदर्भाचे पंढरपूर आहे. या गावात पाऊल ठेवताच तुम्हाला पंढरपुरात पाऊल ठेवल्याचा आनंद मिळतो. यामागे आख्यायिका तर आहेच पण या गावाची रचना आणि मंदिर देखील तुम्हाला पंढरपूर येथे आल्याचा आनंद देऊन जातो. येथील आख्यायिका अशी आहे की, धापेवाडा येथे अनेक वर्षांपूर्वी विठ्ठलाचे भक्त श्रीसंत कोलबाजी महाराज होऊन गेले.
advertisement
4/7
कोलबाजी महाराजांनी त्याकाळी अनेक वर्षे पंढरपूरची वारी केली. त्यांची पांडुरंगावर अपार श्रद्धा होती. त्यानंतर कालांतराने कोलबाजी महाराज पंढरपूरला जाऊ शकत नव्हते. शरीर साथ देत नव्हतं पण, मन मात्र विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर झालं होतं. त्यांनी विठुरायाच्या धावा केला त्यामुळे पांडुरंगाने स्वत: त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना दृष्टान्त दिला. पांडुरंगाने स्वप्नात येऊन कोलबाजी महाराजांना सांगितले की, धापेवाडास्थित चंद्रभागेच्या काठावर असलेल्या विहिरीत पहाटे मी तुला दर्शन देईन. पांडुरंगाच्या सांगण्यानुसार श्रीसंत कोलबाजी महाराज त्या पहाटे विहिरीजवळ गेल्यानंतर त्यांना साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाले.
advertisement
5/7
त्यावेळी कोलबाजी महाराज यांनी विठ्ठलासमोर विनवणी केली आणि पांडुरंगाला सांगितले की, देवा तू इतक्या दूर विटेवर उभा आहेस. तुझ्या दर्शनाला येणे प्रत्येकाला शक्य होत नाही. अनेक अडचणी येतात. त्यामुळे तू आता इथेच थांब. कोलबाजी महाराजांची ही विनवणी ऐकून स्वयंभू विठ्ठलमूर्तीच्या रूपात श्री हरी प्रकट झाले. तेव्हा याठिकाणी मंदिरात विठ्ठलमूर्तीची स्थापना करण्यात आली.
advertisement
6/7
आजही गेल्या 285 वर्षांपासून आषाढी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साक्षात पांडुरंग धापेवाड्यात दाखल होत असतात. त्यावेळी अनेक भक्तगण सुद्धा विठुरायाच्या दर्शनासाठी याठिकाणी येतात, अशी आख्यायिका आहे. अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. आषाढ पौर्णिमेला याठिकाणी मोठी यात्रा असते.
advertisement
7/7
फक्त विदर्भातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात. लोकवर्गणीतून या सर्व कार्यक्रम याठिकाणी पार पडतात. येथील यात्रा ही शेती साहित्यासाठी प्रसिद्ध आहे. दूरदूरून शेतकरी याठिकाणी खरेदीसाठी येतात, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
Ashadhi Wari 2025: नागपूरमधलं असं गाव ज्याला म्हटलं जातं 'विदर्भाचं पंढरपूर', पण नेमकं कारण काय?