TRENDING:

नवीन वर्षाची सुरुवात अंबादेवीच्या दर्शनानं, घरबसल्या घ्या दर्शन, PHOTOS

Last Updated:
अंबादेवी मंदिरात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भक्तांची प्रचंड गर्दी बघायला मिळाली. नवीन वर्षाच्या दिवशी अनेक माता भगिनींनी अंबादेवीची ओटी भरली.
advertisement
1/6
नवीन वर्षाची सुरुवात अंबादेवीच्या दर्शनानं, घरबसल्या घ्या दर्शन, PHOTOS
अमरावतीवासियांचे आराध्य दैवत असलेल्या अंबादेवी मंदिरात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भक्तांची प्रचंड गर्दी बघायला मिळाली. अंबादेवी मंदिरात दररोजच गर्दी असते. पण, आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी 6 वाजता पासून मंदिरात भक्तांची गर्दी असल्याचं पुज्याऱ्यांनी सांगितलं.
advertisement
2/6
अमरावती मधील अंबानगरी चौक येथे अंबादेवी आणि एकवीरा देवीचे पुरातन मंदिर आहे. या मंदिराला मोठा इतिहास लाभलेला आहे. भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणी मातेसोबत विवाह याच अंबादेवी मंदिरात केल्याची आख्यायिका आहे. अंबादेवी मंदिरातून श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे गुफा निघालेली आहे, असेही येथील नागरिक सांगतात.
advertisement
3/6
अमरावतीवरून 30 किलोमिटरवर असलेल्या कौंडण्यपूर येथून येणाऱ्या गुफेतूनच भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेला घेऊन आले होते, त्यांनी नंतर अंबादेवीच्या आशीर्वादाने विवाह केल्याचे देखील मंदिराच्या कोषाध्यक्ष सांगतात. अंबादेवी नवसाला पावते, त्यामुळे नवीन वर्षाच्या दिवशी अनेक माता भगिनींनी अंबादेवीची ओटी भरली. ओटी भरून तिला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि हे नवीन वर्ष सुखाचे जावो, असं मागणं मागितलं.
advertisement
4/6
अंबादेवी मंदिराच्या परिसरात गोंधळी सुद्धा बसलेले असतात. आज नवीन वर्षानिमित्त सकाळी 6 वाजता पासून त्यांचा गोंधळ सुरू झालाय. 'दे आई दे जोगवा दे, आई अंबेचा जोगवा दे 'असं म्हणत ते जोगवा मागत आहेत. त्याच्या या गोंधळाच्या गजरात अनेक भक्तांनी आई अंबाबाईचे दर्शन घेतले.
advertisement
5/6
अमरावतीमधील अंबादेवी ही स्वयंभू असल्याने भक्तांची तिच्यावर अपार श्रध्दा आहे. अंबादेवी ची मूर्ती ही वालुकामय पाषाणाची असून ती पद्मासनात बसलेली आहे. अमरावती मधील अनेक भक्त आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अंबा बाईच्या दर्शनाला आलेत. हार फुल आणि नारळ देवून सर्वात जास्त आज अंबादेवीची ओटी भरण्यात आली. अंबादेवी आणि एकवीरा देवी हे दोन्ही मंदिर एकाच परिसरात आहेत.
advertisement
6/6
अनेक नवदाम्पत्यांनी विशेष पूजा विधी सुद्धा अंबादेवी मंदिरात आयोजित केल्या होत्या. अमरावतीच नाही तर आजूबाजूच्या गावातील अनेक भक्त अंबादेवी मंदिरात सकाळी दर्शनाला येऊन गेलेत. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अनेक भक्तांनी आई अंबाबाई आणि आई एकविरा देवी यांचे दर्शन घेऊन नवीन वर्षात पदार्पण केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
नवीन वर्षाची सुरुवात अंबादेवीच्या दर्शनानं, घरबसल्या घ्या दर्शन, PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल