TRENDING:

Hanuman Jayanti 2025 : महाराष्ट्रातील या गावात फक्त अडीच दिवस होते बंदी हनुमानाचे दर्शन, काय आहे आख्यायिका?

Last Updated:
हे मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा बाल हनुमानजी म्हणून येथील ख्याती आहे, असे तेथील पुजारी सांगतात.
advertisement
1/7
या गावात फक्त अडीच दिवस होते बंदी हनुमानाचे दर्शन, काय आहे आख्यायिका?
नागपूरमधील नरखेड तालुक्यात बेलोना बालमुर्ती हनुमानाचे मंदिर आहे. हे मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा बाल हनुमानजी म्हणून येथील ख्याती आहे, असे तेथील पुजारी सांगतात.
advertisement
2/7
त्याचबरोबर विशेष म्हणजे येथील बाल हनुमानाची मूर्ती ही फक्त अडीच दिवसच भक्तांना दर्शनासाठी असते. इतर दिवस त्या मूर्तीला बंदिस्त ठेवण्यात येते. कोणालाही दर्शन दिल्या जात नाही असेही येथील नागरिक सांगतात. यामागची काय आख्यायिका आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
3/7
बंदी हनुमानाची आख्यायिका काय? याबाबत श्री बजरंगबली रथयात्रा उत्सव ट्रस्ट बेलोनाचे अध्यक्ष प्रदीप जोशी यांनी सांगितले की, आमच्या पूर्वजांना ही बाल हनुमानाची मूर्ती जमिनीतून मिळाली आहे. खूप वर्ष आधी घराला आग लागली होती. तेव्हा त्यातून आवाज येत होता, आवाजाची दिशा बघितली तर जमिनीतून आवाज येत आहे असे समजले. तेव्हा आमच्या पूर्वजांनी आवाजाच्या दिशेने खोदकाम सुरू केले. त्यातून ही बाल हनुमानाची मूर्ती मिळाली.
advertisement
4/7
पुढे ते सांगतात, जमिनीतून काढल्यानंतर मूर्तीला मंदिरात आणण्यात आले. हा साक्षात्कार झाला तेव्हा स्वतः हनुमानाने सांगितले की, मी अडीच दिवसाचा आहे.
advertisement
5/7
त्यामुळे मला फक्त वर्षातून अडीच दिवसच बाहेर ठेवा. बाकी दिवस माझे दर्शन कोणीही घेऊ शकणार नाही. बाकी दिवस मला झाकून ठेवा. म्हणून इथे बाल हनुमानाची मूर्ती झाकून ठेवल्या जाते.
advertisement
6/7
दत्त जयंतीपासून चतुर्दशी, पौर्णिमा आणि प्रतिपदा या तीन दिवस येथील मंदिरात कार्यक्रम असतो. चतुर्दशीला रात्रीला रथ निघतो सकाळी हनुमानजी मंदिरात असतात. संध्याकाळी रथावर असतात, त्यानंतर मिरवणूक असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा रथ पूर्ण दिवस मंदिराजवळ असतो.
advertisement
7/7
नवस केलेलं लोकं आणि इतर भक्त येथे दर्शनासाठी येतात. दिवसभर दर्शन सुरू असते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा मिरवणूक काढली जाते. कृष्ण मंदिर आणि राम मंदिर येथे गोपाळकाला होतो. त्यानंतर मंदिरातील मारोती आणि रथातील मारोती यांची भेट होते. त्यानंतर आरती करून यात्रेचा समारोप केला जातो. या तीन दिवस बेलोना गावात जणू दिवाळीचं असते. हे तीन दिवस या बालमूर्तीचे दर्शन सर्वजण घेऊ शकतात, असे अध्यक्ष प्रदिप जोशी यांनी सांगितले. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
Hanuman Jayanti 2025 : महाराष्ट्रातील या गावात फक्त अडीच दिवस होते बंदी हनुमानाचे दर्शन, काय आहे आख्यायिका?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल