TRENDING:

Hanuman Jayanti 2025: हेमा मालिनींच्या स्वप्नात आले महारुद्र मारुती, महाराष्ट्रातील या मंदिराची अशीही आख्यायिका

Last Updated:
Hanuman Jayanti 2025: प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या स्वप्नात महारुद्र मारुती आले, अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यानंतर त्या अमरावतीतील हनुमान मंदिरात दर्शनासाठी नेहमी येत असतात.
advertisement
1/7
हेमा मालिनींच्या स्वप्नात महारुद्र मारुती, महाराष्ट्रातील या मंदिराची आख्यायिका
महाराष्ट्रातील गावा-गावात हनुमान मंदिर पाहायला मिळतात. त्या मंदिराशी काही खास आख्यायिका देखील जोडल्या गेलेल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील जहांगीरपूर येथे स्वयंभू आणि जागृत हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिराची अख्यायिका ही श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माता यांच्याशी जोडली गेली असल्याचे तेथील नागरिक सांगतात.
advertisement
2/7
जहांगीरपूर येथील महारुद्र मारोती संस्थान हे सर्वत्र प्रसिद्ध आहे. आजूबाजूच्या परिसरातील अनेक भक्त मंगळवार आणि शनिवारी याठिकाणी गर्दी करतात. येथील हनुमानजी हे प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या स्वप्नात गेल्याची आख्यायिका देखील इथले नागरिक सांगतात. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
3/7
जहांगीरपूर येथील पुजारी परमानंद पांडे सांगतात की, द्वापारयुगात जेव्हा श्री कृष्णाचा जन्म झाला तेव्हा हनुमान त्यांच्या भेटीसाठी मथुरेत गेले होते. त्यानंतर त्यांनी रुख्मिणी मातेची भेट घेण्याचे ठरवले आणि ते अमरावती जिल्ह्यांतल कौंडण्यपूर येथे आले. रुक्मिणी मातेची भेट घेतल्यानंतर मातेनी त्यांना याच भागात वास्तव्य करण्यास सांगितले. तेव्हा हनुमान हे कौंडण्यपूर जवळच असलेल्या जहांगीरपूर येथे येऊन वसले, अशी अख्यायिका आहे.
advertisement
4/7
जहांगीरपूरपासून काही अंतरावर मार्डा हे गाव आहे. याठिकाणी 450 वर्ष अगोदर नानासाहेब देशमुख यांचे शेत होते. याच शेतात मजूर काम करत होता. काम करत असताना मजुराच्या विळ्याला रक्त लागले. तेव्हा त्याठिकाणी शोधाशोध केली असता विंचू, साप किंवा आणखी काहीच आढळून आले नाही. मग रक्त कोणाचे? याचा शोध सुरू केला.
advertisement
5/7
जमिनीत खोदकाम करण्यास सुरवात केली. त्यातून हनुमानाचा भव्य मुखवटा निघाला. जेव्हा ही माहिती गावात पसरली तेव्हा सगळ्यांना आश्चर्य झाले. त्यानंतर भाविक याठिकाणी दर्शनाला येऊ लागले, असेही पुजारी सांगतात. त्यानंतर याठिकाणी लाकडी छत तयार करण्यात आले. हळूहळू या मंदिराची ख्याती वाढली. लोकांच्या सहकार्यातून भव्य मंदिर उभारण्यात आले.
advertisement
6/7
सिनेअभिनेत्री हेमा मालिनी यांच्या स्वप्नात देखील जहांगीरपूर येथील महारुद्र मारोतीने दर्शन दिल्याचे संगितले जाते. त्यानंतर हेमा मालिनी मुंबईवरून जहांगीरपुरला आल्या होत्या. तेव्हा त्यांना मंदिरात जाण्यासाठी खडतर रस्ता दिसला. तेव्हा अमरावती ते कौंडण्यपूर येथून आत जाण्यासाठी रस्ता नव्हता.
advertisement
7/7
हेमा मालिनी यांनी रस्त्यासाठी निधी मंजूर केला होता. विशेष म्हणजे यासाठी संपूर्ण निधी हा हेमा मालिनी यांनी दिल्याचेही पुजारी सांगतात. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन आणि मारुती दर्शन या दोन्हीसाठी हेमा मालिनी 1991 मध्ये येथे आल्या होत्या. त्यानंतरही अनेकवेळा त्यांनी महारुद्र मारोतीचे दर्शन घेतले, असेही पुजारी सांगतात. <strong>(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)</strong>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
Hanuman Jayanti 2025: हेमा मालिनींच्या स्वप्नात आले महारुद्र मारुती, महाराष्ट्रातील या मंदिराची अशीही आख्यायिका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल