Hanuman Jayanti 2025: हनुमानांनी सूर्याकडे झेप घेतली, तो अंजनेरी डोंगर पाहिला का?
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Hanuman Jayanti 2025: हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून नाशिकमधील अंजनेरी पर्वत ओळखला जातो. याच पर्वतावरून हनुमान सूर्याला पकडायला झेपावल्याचे सांगितले जाते.
advertisement
1/9

धार्मिक आणि पौराणिक शहर म्हणून नाशिकची जगभरात ख्याती आहे. तसेच कुंभनगरी म्हणून देखील नाशिक-त्र्यंबकेश्वरचा नावलौकिक आहे. बारा ज्योर्तिलिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर मंदिरापासून ते प्रभू रामचंद्र यांच्या वनवासकाळातील तपोभूमीपर्यंत नाशिकला पौराणिक इतिहास लाभला आहे.
advertisement
2/9
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर डोंगररांगेत गिरीदूर्ग प्रकारातील 4 हजार 200 फूट उंचीचा अंजनेरी गड आहे. हा गड अंजनीपुत्र हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून ओळखला जातो. अंजनेरी हे नाव देखील हनुमानाच्या आईच्या म्हणजेच अंजनी मातेच्या नावावरूनच पडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्र्यंबकेश्वर पर्वत रांगेतील ‘अंजनेरी’ हा महत्वाचा पर्वत आहे.
advertisement
3/9
हनुमानाच्या जन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून 20 कि.मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे. अंजनेरी गावात गेल्यावर पायऱ्यांच्या वाटेने गडावर जाता येते. मुळेगावच्या वाटेनेही गडावर जाता येते. तर बुधली नावाची अवघड वाट गडावरून खाली उतरते.
advertisement
4/9
अंजनेरी गावातून किल्ल्यावर जाताना वाटेतच पायऱ्यांच्या जवळच जैनधर्मीय लेणी दिसतात. पुढे पठारावर गेले की काही वेळातच अंजनी मातेचे मंदिर दिसते. मंदिर बऱ्यापैकी प्रशस्त असून, मुक्काम करण्यासाठी देखील तिथं योग्य अशी सोय केलेली आहे.
advertisement
5/9
बाल हनुमानाच्या लिला देखील अगाध होत्या. त्यांच्या पराक्रमांना बालपणही रोखू शकले नाही. अगदी अजाणत्या वयात देथील त्यांनी सूर्याकडे झेप घेतली होती. त्यांच्या पायाचा ठसा याच अंजनेरी पर्वतावर आहे. तिथे एक तळे असून त्याचा आकार अगदी मानवी पायासारखा आहे.
advertisement
6/9
तलावाकडे बारकाईने पाहिल्यावर तलावाचा आकार पायासारखा दिसतो. तसेच तलावात डाव्या पायाचे निशाण आणि त्याची बोटं सूर्याच्या दिशेने दिसतात. या तळ्यात नेहमी पाणी असते. या पाण्याला स्पर्श करणे म्हणजेच हनुमानाच्या चरणाला स्पर्श करण्याचे पुण्य मिळते, अशी भक्तांची मान्यता आहे.
advertisement
7/9
पुढे गेल्यावर आपल्याला अंजनी मातेची गुफा लागते. अंजनी मातेने पुत्र व्हावा म्हणून अनेक वर्ष भगवान शंकरांकडे तपश्चर्या केली. त्यानंतर हनुमानजींचा जन्म झाला, असे सांगितले जाते. अंजनी मातेने याच पर्वतावर हनुमानजींना जन्म दिला. अंजनी मातेच्या कुशीत असलेल्या हनुमानाची एकमेव मूर्ती इथं आहे.
advertisement
8/9
अंजनेरी डोंगरावर 350 हून अधिक वनस्पती असल्याचे एका अभ्यासात स्पष्ट झाले. त्यातील निम्म्या वनस्पती पश्चिम घाटात आणि देशभरात देखील आढळतात. परंतु, ‘सेरोपेजिया अंजनेरिका’ ही दुर्मीळ वनस्पती मात्र जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही आढळत नाही. ती फक्त अंजनेरी डोंगरावर आहे.
advertisement
9/9
नाशिकमधून अर्धा तासाच्या अंतरावर त्र्यंबकरोडवर हे मंदिर आहे. गडाच्या निम्म्यापर्यंत दुचाकी व चारचाकी वाहनाने जाणे शक्य आहे. दीड किलोमीटरची गडाची वाट वाहनाने पूर्ण करता येते. अंजनेरी गडावर रात्रीचा मुक्काम अथवा कुठल्याही प्रकारे ज्वालाग्राही पदार्थ किंवा प्लॅस्टिक अथवा नशेच्या वस्तू घेऊन जाणे प्रतिबंधित केले आहे. अंजनेरी गडाचा प्रदेश संरक्षित म्हणून नाशिक पश्चिम वनविभागाने घोषित केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
Hanuman Jayanti 2025: हनुमानांनी सूर्याकडे झेप घेतली, तो अंजनेरी डोंगर पाहिला का?