TRENDING:

Jalna: खोदकाम करताना आढळलं प्राचीन मंदिर, अहिल्यादेवी होळकर यांच्याशी कनेक्शन

Last Updated:
Ancient Temple: एकेकाळी अहिल्यादेवी होळकर यांचा खासगी परगणा असणाऱ्या अंबड शहरात खोदकाम करताना प्राचीन मंदिर आढळलं आहे.
advertisement
1/7
Jalna: खोदकाम करताना आढळलं प्राचीन मंदिर, अहिल्यादेवी होळकर यांच्याशी कनेक्शन
जालना जिल्ह्यातील अंबड मध्ये खोदकाम करत असताना प्राचीन मंदिर आढळले आहे. हे मंदिर अहिल्यादेवी होळकर यांच्याशी संबंधित असण्याची शक्यता आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या खासगी परगण्यातील शहर म्हणून अंबडची ओळख आहे.
advertisement
2/7
पुण्यश्लोक अहिल्यादेवींची संबंधित अनेक ऐतिहासिक बाबी अंबडमध्ये पाहायला मिळतात. उपविभागीय अधिकारी कार्यालयाची संरक्षण भिंत नव्याने बांधण्यासाठी पाया खोदताना हे प्राचीन मंदिर आढळलं आहे.
advertisement
3/7
अहिल्यादेवी होळकर यांचा खासगी परगणा असलेल्या अंबड शहरात जुने तहसील कार्यालय इमारत ही चार बुरुजाची इमारत होती. होळकर कालखंडात तिथे कमावीसदार बसत असे.
advertisement
4/7
पुढे निजाम होळकर तहानंतर अंबड कचेरीत निजाम तहसीलदार कारभार करीत असे. तेव्हापासून या इमारतीची ओळख तहसील कार्यालय अशी झालेली असून इमारतीचे तीन बुरुज नष्ट झाले आहेत.  
advertisement
5/7
मंत्री यांच्या घरासमोर तर ओझा यांच्या घराशेजारी असलेला बुरुज अखेरच्या घटका मोजीत आहे. नुकतेच जुने तहसील कार्यालय पाडून त्याठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाची नुतन वास्तू बांधकाम झाले आहे. 
advertisement
6/7
संरक्षण भिंत बांधकाम करण्यासाठी पाया खोदतांना 10 फुट रुंदीची व 8 दहा फुट उंचीची भिंत आढळली आहे. शेजारी नारायण मंदिर भिंत असून जुन्या बांधकामाचा भाग मोकळा करुन त्याचे परिक्षण करणे आवश्यक आहे.
advertisement
7/7
जुन्या जाणत्या लोकांकडून सदरील जागा मंदिराची असल्याचे बोलले जात असून आजूबाजूला विखुरलेले मंदिर अवशेष दिसून येतात. त्यामुळे हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (नारायण काळे, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
Jalna: खोदकाम करताना आढळलं प्राचीन मंदिर, अहिल्यादेवी होळकर यांच्याशी कनेक्शन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल