410 किलो वजनाचा महाकाय घंटा, 6 किलोमीटर जातो आवाज, महाराष्ट्रातील हे मंदिर माहितीये का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
येथील नागेश्वर महादेव मंदिराची विशेषतः म्हणजे याठिकाणी 410 किलोचा महाकाय घंटा आहे.
advertisement
1/7

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात श्री क्षेत्र धामंत्री येथे पौराणिक नागेश्वर महादेव मंदिर आहे. तिवसावरून 14 किलोमीटर अंतरावर धामंत्री हे गाव आहे. येथील नागेश्वर महादेव मंदिराची विशेषतः म्हणजे याठिकाणी 410 किलोचा महाकाय घंटा आहे.
advertisement
2/7
साधारणतः छोटा घंटा हा सर्वच मंदिरात असतो. तो घंटा वाजवून मंदिराच्या आत प्रवेश करावा लागतो. मात्र, याठिकाणी चक्क 410 किलो वजनाचा महाकाय घंटा आहे. तो वाजवल्यानानंतर त्याचा आवाज मंदिरापासून 6 किलोमीटर अंतरापर्यंत जातो, असे तेथील नागरिक सांगतात. याठिकाणी श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला भक्तांची प्रचंड गर्दी असते.
advertisement
3/7
तेथील नागरिक सांगतात की, नागेश्वर महादेव मंदिरातील हा महाकाय घंटा 410 किलोचा आहे. याठिकाणीचे हेच एक वैशिष्टे नसून येथील शिवलिंग देखील अत्यंत जुने आहे. त्याचबरोबर या शिवलिंगाला 94 किलोची संरक्षित अष्टधातूची पिंड बसवण्यात आली आहे. 410 किलोचा घंटा आणि ही पिंड बघून भक्त याठिकाणी आकर्षित होऊन दर्शनासाठी येतात.
advertisement
4/7
श्री क्षेत्र धामंत्री येथील हे मंदिर अखंड दगडात कोरलेले असल्याचं देखील सांगण्यात येते. येथील शिवलिंग हे स्वयंभू आहे आणि जवळपास 5 हजार वर्षापूर्वी हे मंदिर बांधण्यात आल्याचं देखील नागरिक सांगतात. पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोध्दार झाला. हे मंदिर हेमाडपंथी आहे.
advertisement
5/7
निसर्गरम्य परिसरात वर्धा नदीच्या काठावर हे मंदिर आहे. या मंदिरात मागितलेली इच्छा पूर्ण होते असे देखील येथील वृद्ध लोकं सांगतात. एका भाविकाने इच्छा पूर्ण झाल्यानंतर या मंदिरात घंटा दान दिला होता. तो घंटा मंदिराच्या आत नाही तर मंदिराच्या बाजूला आणखी एक मंदिर बांधून टांगण्यात आला आहे.
advertisement
6/7
आजही अनेक भक्त येथे येवून हा घंटा वाजवून मनोकामना करतात, असेही तेथील नागरिक सांगतात. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात भक्तांची गर्दी याठिकाणी सर्वाधिक असते.
advertisement
7/7
अनेक लोकं याठिकाणी नवस फेडण्यासाठी येतात. अतिशय प्राचीन आणि वैशिष्टेपूर्ण आहे, असेही तेथील नागरिक सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
410 किलो वजनाचा महाकाय घंटा, 6 किलोमीटर जातो आवाज, महाराष्ट्रातील हे मंदिर माहितीये का?