Mahashivratri: नेपाळच्या प्रसिद्ध मंदिरासारखंच शिवमंदिर सांगलीत, तुम्ही पाहिलंय का?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Mahashivratri: सांगलीतील शिवमंदिराची तुलना नेपाळ आणि वाराणसी येथील पशुपतीनाथ मंदिराशी केली जाते. महाशिवरात्रीला इथं मोठी गर्दी असते.
advertisement
1/9

महाशिवरात्रीनिमित्त देशभरातील शिवमंदिरे भाविकांनी फुलून जातात. सांगली जिल्ह्यात पशुपतीनाथाचं पुरातन मंदिर आहे. या मंदिराची तुलना थेट नेपाळ आणि वाराणसीच्या मंदिरांशी केली जाते. या मंदिराला धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. शेकडो वर्षांपूर्वीच्या या गुढरम्य मंदिराबद्दल वेगवेगळ्या काळातील अनेक अख्यायिका सांगितल्या जातात.
advertisement
2/9
वाळवा तालुक्यातील रेठरेहरणाक्ष गावातून कृष्णा नदी दक्षिण वाहिनी आहे. इथेच कृष्णेच्या रम्य काठावर काळ्या दगडांनी बांधलेले श्री पशुपती मंदिर आहे. मंदिराची रचना तीन भागांमध्ये दिसते. प्रथम मंदिराच्या समोरील पटांगणामध्ये पुरातन अशी एक दगडी दीपमाळ आहे.
advertisement
3/9
दिपमाळेवर गरुड, मारूती अशी शिल्प आहेत. अलीकडे लोखंडी पत्र्याचे नवे सभागृह बांधले आहे. तसेच लहान पुरातन दगडी सभागृह आणि संपूर्ण दगडी बांधकामातील गर्भगृह आहे. सभामंडपामध्ये एकाच शीळेमध्ये कोरलेला नंदी आहे.
advertisement
4/9
श्री पशुपती मंदिराच्या सांस्कृतिक वारशाविषयी रेठरेहरणाक्ष गावचे रहिवासी मोहन जाधव यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये. मंदिराच्या गाभाऱ्याच्या दगडी प्रवेशद्वारावर कोरीव नक्षीकाम आहे. तसेच प्रवेशद्वाराच्या उंबऱ्याला खाली आणि वरती कीर्तीमुख दिसते. दोन्ही बाजूस शस्त्रधारी दोन द्वारपाल आणि दोन हत्तींची शिल्पे आहेत. सभा मंडपामध्ये एका बाजूस श्री गणेशाची मूर्ती तर दुसऱ्या बाजूस देवीची मूर्ती आहे.
advertisement
5/9
साधारण सर्वच शिव मंदिरांमध्ये काळ्या रंगाचे शिवलिंग पाहायला मिळते. परंतु या पशुपती मंदिरामध्ये महाराष्ट्रातील एकमेव असे शुभ्र पांढरे शिवलिंग पाहायला मिळते. संपूर्ण काळ्या पाषाणात उभारलेल्या या मंदिरातील पिंडीवरील शाळूंखा पांढरी शुभ्र असल्याने मंदिराचे वेगळेपण ठरते.
advertisement
6/9
श्री पशुनाथ मंदिराच्या गर्भगृहाखाली रहस्य जाणवते. शिवलिंगाच्या बाजूला एक भुयारी मार्ग आहे. इथून खाली शिवलिंगाच्या अगदी खालोखाल भूमिगत ध्यानगृह आहे. साधारणपणे चार बाय चारचे हे रहस्यमय ध्यानगृह असून इथून कुठे भुयारी मार्ग असेल की काय याचे भाविकांना गुढ वाटते.
advertisement
7/9
श्री पशुपती मंदिराच्या बाहेरील बाजूस दगडी भिंतींवरती शरभशिल्पे आहेत. तसेच गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या नक्षीकामामध्ये दोन्ही बाजूस ऋषीमुनींचे शिल्प आहे. या शिल्पामध्ये ऋषीमुनींनी दोन्ही बाजूस केस सांभार केला आहे. केशरचनेच्या या प्रकारावरून ते पराशर ऋषींचे शिल्प असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.
advertisement
8/9
रेठरेहरणाक्ष येथील कृष्णेचा डोह रमणीय आहे. कृष्णा नदीच्या रम्य काठावर वसलेले हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि भक्तांसाठी एक खास आकर्षण आहे. विशेष म्हणजे इथून वाहणारी कृष्णा नदी ही दक्षिण वाहिनी आहे. रेठरेहरणाक्ष आणि बिचुद गावाच्या शेत जमिनीमध्ये शांत निसर्गाच्या कुशीत वसलेल्या पशुपती मंदिराचे सौंदर्य पावसाळ्यामध्ये अधिक खुलते.
advertisement
9/9
रेठरेहरणाक्ष आणि पंचक्रोशीतील भक्तांसह मंदिरा विषयी माहिती असलेले कित्येक शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. श्रावण महिन्यामध्ये तसेच महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी असते. रेठरे हरणाक्ष गावचे ग्रामस्थ श्री पशुपती मंदिरामध्ये पारायण सोहळा साजरा करतात. महाशिवरात्री दिवशी पारायण सप्ताहाची सांगता करून यात्रा करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
Mahashivratri: नेपाळच्या प्रसिद्ध मंदिरासारखंच शिवमंदिर सांगलीत, तुम्ही पाहिलंय का?