त्रिपुरारी पौर्णिमेला लक्ष दिव्यांचा उत्सव, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराचं मनोहरी दृश्य
- Published by:News18 Marathi
Last Updated:
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर लक्ष दिव्यांनी उजळून निघाले.
advertisement
1/7

दिवाळीनंतर येणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेला हिंदू धर्मात मोठं धार्मिक महत्त्व आहे.
advertisement
2/7
त्यामुळे या दिवशी देशभरातील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
advertisement
3/7
<a href="https://news18marathi.com/pune/">पुणे</a> येथील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातही धार्मिक कार्यक्रम करण्यात आले तसेच बाप्पाला महानैवद्य दाखवण्यात आला.
advertisement
4/7
मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत लावण्यात आलेल्या एक लाख दिव्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा परिसर उजळून गेला.
advertisement
5/7
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
advertisement
6/7
यावेळी मंदिराचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
advertisement
7/7
दीपोत्सवाचे मनोहारी दृश्य डोळ्यामध्ये साठविण्यासोबतच मोबाईल कॅमे-यामध्ये कैद करण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
त्रिपुरारी पौर्णिमेला लक्ष दिव्यांचा उत्सव, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराचं मनोहरी दृश्य