Oppoचा फ्लॅगशीप फोन 19 हजार रुपयांनी स्वस्त! कॅमेरा आहे जबरदस्त, फीचर्स पाहून पडाल प्रेमात
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Oppo Find X8 Pro फोन तुम्ही अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. या फोनवर तब्बल 19 हजार रुपयांपर्यंत सूट मिळतेय. तुम्हाला भारी कॅमेरा असलेला फोन हवा असेल तर हा फोन बेस्ट आहे.
advertisement
1/7

आपल्यापैकी अनेकांना भारी फोन खरेदी करायचा असतो. पण आपलं बजेटच नसतं. तुम्हाला दीर्घकाळापासून प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, पण बजेटमुळे तुम्ही थांबाल असेल तर ही संधी सोडू नका. कारण Oppo Find X8 Pro या फोनवर मोठं डिस्काउंट मिळतंय. ज्यामुळे हा फोन पहिल्याच्या तुलनेत खुपच परवडणारा झालाय.
advertisement
2/7
हा फोन तुम्ही फ्लिपकार्टवर अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. या स्मार्टफोनची लॉन्च किंमत 99,999 रुपये होते. ती आता 84,999 रुपये झालीये. म्हणजेच तुम्हाला थेट 15,000 रुपयांची सूट दिली जातेय. यासोबतच तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस किंवा SBI क्रेडिट कार्डनेही ईएमआय ट्रांझेक्शन करत असाल तर 4,000 रुपयांचं अॅडिशनल डिस्काउंटही मिळू शकतं.
advertisement
3/7
या सर्व ऑफर्स एकत्र केल्यास तुम्हाला जवळपास 19,000 रुपयांचं डिस्काउंट मिळू शकतं. यासोबतच जुना फोन एक्सचेंज करुन किंमत आणखी कमी केली जाऊ शकते.
advertisement
4/7
या फोनमध्ये परफॉर्मेंससाठी मीडियाटेक डायमेंसिटी 9400 प्रोसेसर दिलाय. जो हेवी गेमिंग आणि मल्टीटास्किंग सहज सांभाळू शकते.
advertisement
5/7
ओप्पो फाइंड X8 प्रो हा भारी फ्लॅगशिप फोन आहे. यात 6.78 इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळतो. हा 120Hz रिफ्रेश रेट आणि 4,500 निट्सच्या पीक ब्राइटनेससह येतो. हा डिस्प्ले डॉल्बी विशन सपोर्ट करतो. ज्यामुळे व्हिडिओ पाहण्याचा अनुभव आणखी सुधारतो.
advertisement
6/7
या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याचा कॅमेरा आहे. यात क्वाड कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा Sony LYT808 मेन कॅमेरा, 50 मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स (3x झूम), 50 मेगापिक्सलचा 6x ऑप्टिकल झूम कॅमेरा आणि 50 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड लेन्सचा समावेश आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही दिलाय.
advertisement
7/7
फोनमध्ये पॉवरसाठी 5,910mAh ची बॅटरी दिली आहे. जी 80W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Oppoचा फ्लॅगशीप फोन 19 हजार रुपयांनी स्वस्त! कॅमेरा आहे जबरदस्त, फीचर्स पाहून पडाल प्रेमात