TRENDING:

Numerology: 'या' 4 जन्मतारखांच्या मुली खरोखर असतात 'पापा की परी', वडिलांना मिळवून देतात धनसंपत्ती!

Last Updated:
Lucky Girls: अंकशास्त्र सांगतं की, जन्मतारीख व्यक्तीच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. व्यक्तीचा स्वभाव, भविष्य, चांगल्या-वाईट सवयी, सुख, दु:ख या अंकावर अवलंबून असतं.
advertisement
1/7
'या' जन्मतारखांच्या मुली खरंच असतात 'पापा की परी', वडिलांना मिळवून देतात संपत्ती
ज्योतिषशास्त्रात जेवढं महत्त्व राशीला आहे, तेवढंच महत्त्व अंकशास्त्रात जन्मतारखेला आहे. ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1 ते 9 तारखेला होतो, त्यांचा मूलांक तोच असतो.
advertisement
2/7
ज्या व्यक्तींचा जन्म 2 आकडी तारखेला होतो. त्या तारखेच्या 2 अंकांची बेरीज हा त्या व्यक्तींचा मूलांक असतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 11 तारखेला झाला असेल तर तिचा मूलांक असतो 2 (1+1=2).
advertisement
3/7
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 मूलांक असलेल्या मुली अतिशय भाग्यवान असतात. जिथं त्यांचा प्रवेश होतो तिथली सगळी बिघडलेली कामं मार्गी लागायला सुरुवात होते.
advertisement
4/7
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेल्या जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. या चारही तारखांना जन्मलेल्या मुली त्यांच्या वडिलांसाठी अत्यंत लकी मानल्या जातात.
advertisement
5/7
या मुलींच्या जन्मानंतर त्यांच्या वडिलांच्या नशिबाचं दार उघडतं असं म्हणतात. तसंच या मुली खूप सुंदर, बुद्धिमान आणि गुणवान असतात. त्या आपल्या सद्गुणांच्या जोरावर खूप यशस्वी होतात. त्यांना कधीच पैशांची कमतरता भासत नाही. त्यांची आर्थिक स्थिती भक्कम असते.
advertisement
6/7
मूलांक 2 असलेल्या मुलींची पावलं अतिशय शुभ मानली जातात. ज्योतिषी सांगतात, त्यांच्या पावलांचा जिथं जिथं स्पर्श होतो, तिथं तिथं यश आणि समृद्धीनं भरभराट होते.
advertisement
7/7
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Numerology: 'या' 4 जन्मतारखांच्या मुली खरोखर असतात 'पापा की परी', वडिलांना मिळवून देतात धनसंपत्ती!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल