TRENDING:

Tirupati : तिरुपती बालाजीचं मंदिर 'या' दिवशी रहाणार 10 तास बंद, जाणून घ्या कारण आणि नवे नियम

Last Updated:
हे बदल नेमके का आहेत आणि कोणत्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत, हे जाणून घेणे तुमच्या प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
advertisement
1/8
तिरुपती बालाजीचं मंदिर 'या' दिवशी रहाणार 10 तास बंद, काय आहे कारण आणि नवे नियम
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि 'कलियुगातील वैकुंठ' मानल्या जाणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानच्या दर्शनासाठी आपण कित्येक महिने आधी नियोजन करतो. कोणाचे नवस असतात, तर कोणाला त्या पवित्र डोंगरावरून मिळणारी मनःशांती हवी असते. पण, जर तुम्ही येत्या 3 मार्च रोजी तिरुपती बालाजीच्या दर्शनाचा विचार करत असाल, तर तुमचे नियोजन थोड्या वेळासाठी थांबवा.
advertisement
2/8
कारण, 3 मार्च रोजी खगोलशास्त्रीय घटना आणि धार्मिक विधींमुळे तिरुपती मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी 10 तासांहून अधिक काळ बंद राहणार आहेत. हे बदल नेमके का आहेत आणि कोणत्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत, हे जाणून घेणे तुमच्या प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
advertisement
3/8
मंदिर बंद राहण्याचे मुख्य कारण: चंद्रग्रहण3 मार्च रोजी चंद्रग्रहण (Lunar Eclipse) होत आहे. शास्त्र आणि आगम नियमांनुसार, ग्रहणाच्या काळात आणि ग्रहणापूर्वी काही तास मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्याची परंपरा आहे. तिरुपतीमध्ये हे नियम अतिशय कडकपणे पाळले जातात.
advertisement
4/8
ग्रहणाची वेळ: दुपारी 3.20 मिनिटांनी ग्रहण सुरू होईल आणि संध्याकाळी 6:46 मिनिटांनी संपेल.मंदिर बंद राहण्याची वेळ: ग्रहण सुरू होण्यापूर्वी 6 तास आधी म्हणजे सकाळी 9:00 वाजेपासून ते रात्री 07:30 वाजेपर्यंत मंदिर पूर्णपणे बंद राहील.
advertisement
5/8
मंदिर कधी उघडणार आणि दर्शनाचे काय?रात्री 07:30 वाजता मंदिराचे दरवाजे उघडले जातील. मात्र, त्यानंतर लगेच दर्शन सुरू होणार नाही. 'शुद्धी' आणि 'पुण्यवाचन' यांसारखे शुद्धीकरण विधी पार पडल्यानंतर, रात्री 08:30 वाजता भाविकांसाठी दर्शन पुन्हा सुरू होईल.
advertisement
6/8
'या' महत्त्वाच्या सेवा आणि दर्शन रद्दचंद्रग्रहणामुळे 3 मार्च रोजी टीटीडी (TTD) प्रशासनाने अनेक महत्त्वाच्या सेवा रद्द केल्या आहेत. जर तुम्ही खालीलपैकी कोणत्याही सेवेचे बुकिंग केले असेल, तर कृपया नोंद घ्या.अष्टदल पाद पद्माराधना, कल्याणोत्सवम, ऊंजल सेवा, आर्जिता ब्रह्मोत्सवम आणि सहस्र दीपांलंकार सेवा यांसारखे सर्व विधी रद्द करण्यात आले आहेत.व्हीआयपी ब्रेक दर्शन, श्रीवाणी दर्शन आणि 300 रुपयांचे स्पेशल एन्ट्री दर्शन त्या दिवशी उपलब्ध नसेल.
advertisement
7/8
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, लहान मुले असलेले पालक, एनआरआय (NRI) आणि देणगीदारांसाठीचे खास दर्शनही त्या दिवशी रद्द करण्यात आले आहे.
advertisement
8/8
भाविकांसाठी प्रशासनाचे आवाहनतिरुमला तिरुपती देवस्थानने सर्व भाविकांना आवाहन केले आहे की, प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी या वेळेची विशेष काळजी घ्यावी. ग्रहणामुळे होणारी गर्दी आणि दर्शनाची वेळ मर्यादित असल्याने भाविकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे 3 मार्च रोजी मंदिरात जाण्याऐवजी दर्शनासाठी इतर तारखांचा विचार करणे सोयीचे ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Tirupati : तिरुपती बालाजीचं मंदिर 'या' दिवशी रहाणार 10 तास बंद, जाणून घ्या कारण आणि नवे नियम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल