TRENDING:

पैशांचा व्यवहार करताना तुम्हीही करता 'या' चुका? इग्नोर केलात तर नुकसान फिक्स

Last Updated:
वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये धनाचा संबंध केवळ तुमच्या कष्टाशी नसून, तो तुमच्या सवयींशी देखील जोडलेला असतो. अनेकदा आपण खूप पैसे कमवतो, पण ते हातात टिकत नाहीत किंवा घरात नेहमी आर्थिक ओढताण असते.
advertisement
1/7
पैशांचा व्यवहार करताना तुम्हीही करता 'या' चुका? इग्नोर केलात तर नुकसान फिक्स
वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये धनाचा संबंध केवळ तुमच्या कष्टाशी नसून, तो तुमच्या सवयींशी देखील जोडलेला असतो. अनेकदा आपण खूप पैसे कमवतो, पण ते हातात टिकत नाहीत किंवा घरात नेहमी आर्थिक ओढताण असते. यामागे आपण पैसे घेताना किंवा देताना कळत-नकळत करणाऱ्या काही चुका असू शकतात.
advertisement
2/7
उजव्या हाताचा वापर करा: पैसे घेताना किंवा देताना नेहमी उजव्या हाताचा वापर करावा. उजवा हात हा सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. डाव्या हाताने पैसे देणे हे शास्त्रात अशुभ मानले जाते, ज्यामुळे धनाची हानी होऊ शकते.
advertisement
3/7
सूर्यास्तानंतर व्यवहार टाळा: वास्तुशास्त्रानुसार, सूर्यास्तानंतर कोणालाही उधार किंवा कर्ज देऊ नये. संध्याकाळची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. या वेळी घराबाहेर धन दिल्यास लक्ष्मी घरातून निघून जाते आणि घराची 'बरकत' कमी होते, अशी धारणा आहे.
advertisement
4/7
गुरुवारी कर्ज घेऊ नका: गुरुवार हा देवांचा गुरु बृहस्पती यांचा दिवस आहे. या दिवशी कोणाकडूनही कर्ज घेऊ नये. गुरुवारी घेतलेले कर्ज लवकर फिटत नाही आणि आर्थिक समस्या वाढत जातात. मात्र, या दिवशी कोणाला कर्ज दिले तर ते परत मिळण्याची शक्यता जास्त असते.
advertisement
5/7
जमिनीवर पैसे ठेवू नका: पैसे हे लक्ष्मीचे रूप मानले जातात. त्यामुळे पैसे कधीही जमिनीवर किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नयेत. जर चुकून पैसे हातांतून जमिनीवर पडले, तर ते उचलून आधी डोक्याला लावावे आणि लक्ष्मीची क्षमा मागावी.
advertisement
6/7
मोडलेल्या नोटा किंवा नाणी देऊ नका: कोणालाही पैसे देताना ते नीट नीटके करून द्यावेत. फाटलेल्या नोटा किंवा डाग लागलेले पैसे कोणालाही देणे म्हणजे लक्ष्मीचा अपमान करण्यासारखे आहे. नेहमी स्वच्छ नोटांचा वापर करावा, जेणेकरून देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांच्याही मनात प्रसन्नता राहील.
advertisement
7/7
पैशांची मोजणी करताना चूक टाळा: काही लोकांना नोटा मोजताना बोटाला 'थुंकी' लावण्याची सवय असते. वास्तूनुसार हे अत्यंत चुकीचे आहे. अन्नाचा किंवा थुंकीचा संबंध धनाशी लावल्याने अन्नाचा आणि धनाची देवी लक्ष्मी या दोघांचा अपमान होतो, ज्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
पैशांचा व्यवहार करताना तुम्हीही करता 'या' चुका? इग्नोर केलात तर नुकसान फिक्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल