Motorolaचा मास्टरस्ट्रोक! आयफोनला टक्कर देण्यासाठी येतोय Signature, कधी होणार लॉन्च?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Motorola Signature : मोटोरोला सिग्नेचर मध्ये जबरदस्त टेक्नॉलॉजी पाहायला मिळू शकते. लीक रिपोर्ट्सनुसार, यामध्ये 6.8 इंचांचा मोठा LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
advertisement
1/6

नवी दिल्ली : कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये पहिल्यांदाच जगासमोर सादर केलेल्या मोटोरोला सिग्नेचर (Motorola Signature) स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होऊ शकतो. कंपनीने नुकतेच सोशल मीडियावर याविषयी काही माहिती शेअर केली होती. मात्र लॉन्चिंग डेटचा खुलासा केला नव्हता. मात्र एका सोशल मीडिया लीकमध्ये फोनची लॉन्च डेट, भारतीय किंमत आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा करण्यात आला आहे.
advertisement
2/6
प्रसिद्ध टिपस्टर संजू चौधरी यांच्या मते, मोटोरोला हा प्रीमियम फ्लॅगशिप फोन 23 जानेवारी 2026 रोजी भारतात लाँच करण्याची योजना आखत आहे. सर्वात आश्चर्यकारक पैलू म्हणजे त्याची किंमत. लीकनुसार, या फोनचा टॉप-एंड व्हेरिएंट, 16GB रॅम + 1TB स्टोरेज मॉडेल, रिटेल बॉक्सवर ₹84,999 मध्ये मिळू शकतो. ही माहिती खरी ठरली तर, मोटोरोला प्रीमियम सेगमेंटमध्ये सॅमसंग आणि अॅपलला थेट आव्हान देण्याची तयारी करत आहे.
advertisement
3/6
Motorola Signature प्रोसेसर आणि डिस्प्ले : फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, मोटोरोला सिग्नेचरमध्ये टेक्नॉलॉजीचा एक अनोखा मिलाफ असण्याची अपेक्षा आहे. लीक झालेल्या रिपोर्टनुसार, यात 6.8 इंचाचा मोठा LTPO AMOLED डिस्प्ले असेल. हा फोन गेमिंग उत्साहींसाठी वरदान ठरेल, कारण त्याचा रिफ्रेश रेट 165Hz असल्याचे नोंदवले गेले आहे, जो अतिशय स्मूथ व्हिज्युअल एक्सपीरियन्स प्रदान करतो.
advertisement
4/6
कामगिरीला पुढील स्तरावर नेण्यासाठी, मोटोरोलाने क्वालकॉमचा सर्वात शक्तिशाली आणि लेटेस्ट Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर वापरला आहे. हा चिपसेट एआय फीचर्सच्या आणि मल्टीटास्किंगच्या बाबतीत बाजारात असलेल्या इतर कोणत्याही फोनशी स्पर्धा करण्यास सक्षम आहे.
advertisement
5/6
मोटोरोला सिग्नेचर कॅमेरा सेटअप : मोटोरोला सिग्नेचरमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये 50MP LYT828 प्रायमरी सेन्सर, 50MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि 50MPसेकंडरी/पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा असेल. शिवाय, सेल्फी प्रेमींसाठी, 50MPचा शक्तिशाली फ्रंट कॅमेरा देखील अपेक्षित आहे, जो हाय-रिझोल्यूशन व्हिडिओ कॉलिंग आणि पोर्ट्रेट शॉट्ससाठी आदर्श आहे.
advertisement
6/6
बॅटरी, चार्जिंग आणि ड्यूरेबिलिटी : दीर्घ बॅकअपसाठी या डिव्हाइसमध्ये 5200mAh ची दमदार बॅटरी मिळू शकते. जी वेगाने चार्ज करण्यासाठी 90W फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. सुरक्षेच्या हिशोबाने फोन IP68/IP69 रेटिंगसह सादर केला जाऊ शकतो. हे धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित ठेवेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Motorolaचा मास्टरस्ट्रोक! आयफोनला टक्कर देण्यासाठी येतोय Signature, कधी होणार लॉन्च?