TRENDING:

का येतात मृत्यूचे स्वप्न? एक्सपर्टने सांगितलं यामागचं कारण

Last Updated:
स्वप्नात कधी लोक स्वत:ला मरताना पाहतात तर कधी त्यांच्या जवळील किंवा अगदी खास व्यक्तीचा मृत्यू झालेला दिसतो. पण असं का होतं? अशी स्वप्न का पडतात याचा अर्थ अनेकांना ठावूक नसतो.
advertisement
1/8
का येतात मृत्यूचे स्वप्न? एक्सपर्टने सांगितलं यामागचं कारण
आपण रात्रीच्या वेळी गाढ झोपेत असलो की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न येतात. तसे पाहाता स्वप्न येणं किंवा पाहाणे हे अगदी सामान्य आहे. खरंतर जेव्हा व्यक्ती पूर्णपणे झोपेत नसतो आणि पूर्णपणे जागा ही नसतो अशा स्थितीत असतो तेव्हा त्याला स्वप्न पडतात. एक्सपर्ट्सनुसार जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा आपला मेंदू सक्रिय असतो. ज्यामुळे आपल्याला स्वप्न पडतात.
advertisement
2/8
अनेकांना मरण्याचे किंवा मृत्यूशी संबंधीत अनेक स्वप्न पडल्याचे सांगितले जाते. स्वप्नात कधी लोक स्वत:ला मरताना पाहतात तर कधी त्यांच्या जवळील किंवा अगदी खास व्यक्तीचा मृत्यू झालेला दिसतो. पण असं का होतं? अशी स्वप्न का पडतात याचा अर्थ अनेकांना ठावूक नसतो.
advertisement
3/8
एका स्लीप एक्सपर्टनुसार, जर स्वप्नात येणाऱ्या मत्यूला सकारात्मकतेनं पाहून त्याचं बारकाईने विश्लेषण केलं गेलं तर यामुळे आयुष्यातील काही गोष्टींबद्दल जाणून घेण्यास मदत मिळते. एक्सपर्टने यामध्ये 5 प्रकारत्या मृत्यूच्या स्वप्नांबद्दल सांगितले आहे. ज्यामध्ये त्यांनी त्याचा अर्थ देखील सांगितला आहे.
advertisement
4/8
स्वत:ला मरताना पहाणे जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला हिंसकपणे मरताना पाहात असाल तर खऱ्या आयुष्यात तुम्हाला तुमच्या शस्त्रुंवर नजर ठेवण्याचे संकेत देत आहे. तेच जर तुम्ही अगदी सामान्यपणे स्वप्नात मरत असाल तर तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्याचा आणि आध्यात्मीक गोष्टी विकसीत करण्याचा संकेत दिला जात आहे.
advertisement
5/8
कोणत्या ही खास व्यक्तीला मरताना पहाणे आपल्या जवळच्या व्यक्तीला स्वप्नात पहाणे याचा अर्थ ती व्यक्ती घर किंवा शहर सोडून कुठेतरी जाणार आहे.
advertisement
6/8
एखाद्या पाळीव प्राण्याचा मृत्यू पहाणे एक्सपर्ट्सनुसार एखाद्या पाळीव प्राण्याचा मृत्यू स्वप्नात पाहाणे म्हणजे दुख किंवा पिडा तुमच्या आयुष्यातून निघून जाण्याचे संकेत आहे.
advertisement
7/8
स्वप्नात मेल्यामुळे झोप उडणे एक्सपर्टनुसार, जर तुम्ही स्वत:ला किंवा जवळच्या व्यक्तीला मरताना पाहाताय आणि तेव्हाच तुमची झोप उडाली आहे. याचा अर्थ असा की काही गोष्टींची तुम्हाला माहिती मिळणार आहे. तसेच आयुष्यात तुम्हाला कठीण निर्णय घेण्याची वेळ आली आहे. असा हा संकेत असावा.
advertisement
8/8
मृत्यूसंबंधीत सारखं सारखं स्वप्न येणं सतत मृत्यू संबंधीत स्वप्न पडणं याचा अर्थ असा की तुम्ही चिंतेत आहात. याचाच अर्थ असा ही होतो की तुम्हाला आरामाची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
का येतात मृत्यूचे स्वप्न? एक्सपर्टने सांगितलं यामागचं कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल