TRENDING:

शिवलिंगावर दह्याचा अभिषेक केल्याने खरचं प्रसन्न होतात महादेव, नेमका काय होतो परिणाम?

Last Updated:
हिंदू धर्मात भगवान शिवाची उपासना करताना 'अभिषेकाला' अनन्यसाधारण महत्त्व आहे. महादेवाला भोळा आणि लवकर प्रसन्न होणारा देव म्हटले जाते. भक्त आपल्या श्रद्धेनुसार शिवलिंगावर जल, दूध, मध किंवा तुपाचा अभिषेक करतात.
advertisement
1/7
शिवलिंगावर दह्याचा अभिषेक केल्याने खरचं प्रसन्न होतात महादेव, काय होतो परिणाम?
हिंदू धर्मात भगवान शिवाची उपासना करताना 'अभिषेकाला' अनन्यसाधारण महत्त्व आहे. महादेवाला भोळा आणि लवकर प्रसन्न होणारा देव म्हटले जाते. भक्त आपल्या श्रद्धेनुसार शिवलिंगावर जल, दूध, मध किंवा तुपाचा अभिषेक करतात.
advertisement
2/7
मात्र, दह्याचा अभिषेक करणे हे ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्मात अत्यंत विशेष मानले गेले आहे. दही हे केवळ पंचामृताचा एक भाग नाही, तर दह्याचा स्वतंत्रपणे केलेला अभिषेक भक्ताच्या आयुष्यातील अनेक संकटे दूर करण्याची ताकद ठेवतो.
advertisement
3/7
कुटुंबात प्रेम आणि गोडवा वाढतो: असे मानले जाते की, ज्या घरांमध्ये पती-पत्नीमध्ये किंवा कौटुंबिक सदस्यांमध्ये वारंवार मतभेद होतात, त्यांनी शिवलिंगावर दह्याचा अभिषेक करावा. दह्याच्या थंडाव्याप्रमाणेच घरातील वातावरण शांत होते आणि नात्यांमधील ओलावा वाढतो.
advertisement
4/7
मानसिक शांती आणि तणावमुक्ती: दह्याचा संबंध चंद्राशी जोडला जातो. ज्या लोकांची रास किंवा कुंडलीत चंद्रदोष आहे किंवा जे लोक सतत मानसिक तणावात असतात, त्यांना दह्याचा अभिषेक केल्याने मानसिक शांती लाभते. यामुळे नकारात्मक विचार दूर होऊन मन प्रसन्न राहते.
advertisement
5/7
उत्तम आरोग्य आणि रोगमुक्ती: अनेक पौराणिक कथांमध्ये नमूद केल्यानुसार, दह्याचा अभिषेक केल्याने शारीरिक व्याधींपासून मुक्ती मिळते. विशेषतः ज्यांना पोटाचे विकार किंवा उष्णतेचे त्रास आहेत, त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो.
advertisement
6/7
स्वभावातील उग्रता कमी होते: ज्या व्यक्तींना खूप जास्त राग येतो किंवा जे स्वभावाने अतिशय चिडचिडे आहेत, त्यांच्यासाठी दह्याचा अभिषेक करणे फायदेशीर ठरते. महादेवाचा उग्र अवतार शांत करण्यासाठी दह्याचा वापर केला जातो, ज्यामुळे भक्ताचा स्वभावही शांत आणि संयमी बनतो.
advertisement
7/7
अडकलेली कामे मार्गी लागतात: जर तुमची कामे शेवटच्या क्षणी बिघडत असतील किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल, तर सोमवारी किंवा प्रदोष काळात दह्याचा अभिषेक करावा. यामुळे नशिबाची साथ मिळते आणि कामातील अडथळे दूर होतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
शिवलिंगावर दह्याचा अभिषेक केल्याने खरचं प्रसन्न होतात महादेव, नेमका काय होतो परिणाम?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल