TRENDING:

माघ पौर्णिमेला 'या' एका चुकीमुळे ओढवू शकतं मोठं संकट, शास्त्रात थेटच सांगितले आहेत परिणाम!

Last Updated:
हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला 'मोक्षदायिनी पौर्णिमा' मानले जाते. या दिवशी गंगास्नान आणि दानाला अफाट महत्त्व आहे. मात्र, ज्योतिषशास्त्र आणि पुराणानुसार या दिवशी अशा काही गोष्टी आहेत ज्या करणे वर्ज्य मानले गेले आहे.
advertisement
1/7
माघ पौर्णिमेला 'या' एका चुकीमुळे ओढवू शकतं मोठं संकट, वाचा परिणाम!
हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला 'मोक्षदायिनी पौर्णिमा' मानले जाते. या दिवशी गंगास्नान आणि दानाला अफाट महत्त्व आहे. मात्र, ज्योतिषशास्त्र आणि पुराणानुसार या दिवशी अशा काही गोष्टी आहेत ज्या करणे वर्ज्य मानले गेले आहे.
advertisement
2/7
जर तुम्ही या दिवशी 'कोणाचाही अपमान' केला किंवा घरामध्ये 'कलह' केला, तर त्याचे परिणाम अत्यंत गंभीर असू शकतात. असे मानले जाते की, माघ पौर्णिमेला स्वतः भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पृथ्वीवर संचार करतात. अशा पवित्र दिवशी केलेली एक छोटीशी चूक तुमच्या घरातील सुख-समृद्धी हिरावून घेऊ शकते.
advertisement
3/7
उशिरापर्यंत झोपणे टाळा: पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठणे अनिवार्य मानले जाते. जे लोक या दिवशी उशिरापर्यंत झोपून राहतात, त्यांच्यावर माता लक्ष्मी कोपते. उशिरा उठल्याने शरीरातील सकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि घरात दरिद्रता येते.
advertisement
4/7
केस आणि नखे कापू नका: धार्मिक मान्यतेनुसार, पौर्णिमेच्या तिथीला केस कापणे, नखे काढणे किंवा दाढी करणे अशुभ मानले जाते. असे केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती कमकुवत होते, ज्यामुळे मानसिक तणाव आणि कामात अडथळे निर्माण होतात.
advertisement
5/7
तामसिक अन्नाचे सेवन टाळा: या दिवशी विसरूनही मांस, मदिरा, लसूण किंवा कांदा यांसारख्या तामसिक पदार्थांचे सेवन करू नका. माघ पौर्णिमा ही पूर्णपणे सात्विक राहण्याची तिथी आहे. याचे उल्लंघन केल्याने घरात आजारपण आणि आर्थिक संकट येऊ शकते.
advertisement
6/7
कोणाचाही अपमान करू नका: या दिवशी तुमच्या दारात आलेल्या कोणत्याही गरीब, गरजू किंवा भिकाऱ्याला रिकाम्या हाती पाठवू नका. तसेच घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा किंवा स्त्रियांचा अपमान करू नका. कोणाचाही तळतळाट घेतल्याने 'पितृदोष' निर्माण होऊ शकतो, ज्याचा परिणाम पुढच्या पिढीवरही होतो.
advertisement
7/7
तुळशीची पाने तोडू नका: पौर्णिमा आणि एकादशीला तुळशीची पाने तोडणे महापाप मानले जाते. तुळशीला भगवान विष्णूंची प्रिय मानली जाते. या दिवशी पाने तोडल्याने विष्णू-लक्ष्मीची कृपा मिळत नाही आणि घरात अशांती नांदते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
माघ पौर्णिमेला 'या' एका चुकीमुळे ओढवू शकतं मोठं संकट, शास्त्रात थेटच सांगितले आहेत परिणाम!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल