TRENDING:

 रस्त्यावर मृत कावळा दिसला तर काय होतं? पूर्वज नाराज की, शनीची वक्रदृष्टी? त्यामागचे गूढ संकेत काय?

Last Updated:
हिंदू धर्मात कावळ्याला पितरांचे रूप मानले जाते आणि त्यामुळे त्याला अन्नदान करून तर्पण दिले जाते. कावळा शास्त्रानुसार, जर एखाद्याला रस्त्यात मृत कावळा दिसला, तर ते फारच अशुभ...
advertisement
1/7
रस्त्यावर मृत कावळा दिसला तर काय होतं? त्यामागचे गूढ संकेत काय?
कावळ्यांना आपण आपले पूर्वज मानतो आणि त्यांच्याशी काही शुभ-अशुभ घटना जोडलेल्या असतात असं म्हटलं जातं. भविष्यात काय घडणार आहे, याची काही संकेत किंवा चिन्हं असतात. त्यापैकीच एक म्हणजे कावळ्याचं शकुन अर्थात संकेत. कावळे काही गोष्टींचे संकेत देऊ शकतात असं मानलं जातं. चला तर मग जाणून घेऊया, रस्त्यावर अचानक मृत कावळा दिसल्यास काय होतं.
advertisement
2/7
असं म्हणतात की, तुम्ही रस्त्याने प्रवास करत असताना अचानक तुमच्यासमोरून एखादा कावळा उडताना दिसला, तर ते शुभ किंवा अशुभ अशा दोन्ही कारणांसाठी असू शकतं. कारण हिंदू धर्मात कावळ्याला आपले पूर्वज मानले जाते. म्हणूनच आपण कावळ्यांना नैवेद्य अर्पण करतो.
advertisement
3/7
कावळ्याला न्यायदेवता शनिदेवाचं वाहन देखील मानलं जातं, त्यामुळे अचानक कावळा दिसल्यास त्याचे शुभ आणि अशुभ दोन्ही अर्थ असू शकतात.
advertisement
4/7
तुमच्या आजूबाजूला कावळ्यांच्या हालचालींचं निरीक्षण करून तुम्ही तुमच्या भविष्यासाठी काही संकेत मिळवू शकता. रस्त्यावर कुठेही मृत कावळा दिसणं हे वाईट संकेत मानला जातो. कारण आधी सांगितल्याप्रमाणे, कावळ्यांना आपले पूर्वज मानले जाते. अशा स्थितीत मृत कावळा दिसल्यास याचा अर्थ असा होतो की, तुमचे पूर्वज तुमच्यावर खूप रागावले आहेत.
advertisement
5/7
असं म्हणतात की, मृत कावळा कोणाच्या तरी मृत्यूची भविष्यवाणी करतो. जर तुम्हाला रस्त्यावर मृत कावळा दिसला, तर याचा अर्थ असा की, नजीकच्या भविष्यात तुमच्या आयुष्यात एखादं मोठं संकट येणार आहे.
advertisement
6/7
मृत कावळा शनिदेवाचा राग देखील व्यक्त करतो. हे शनिदेवाच्या वाईट प्रभावाचं सूचक आहे. जर तुम्हाला रस्त्यावर मृत कावळा दिसला, तर याचा अर्थ असाही होतो की, शनिदेव काही कारणास्तव तुमच्यावर नाराज आहेत.
advertisement
7/7
जर तुम्हाला अशाप्रकारे मृत कावळा दिसला, तर लगेच शनि मंदिरात जाऊन माफी मागा आणि दिवा लावा. असं म्हणतात की, यामुळे पूर्वजांचा रागही शांत होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
 रस्त्यावर मृत कावळा दिसला तर काय होतं? पूर्वज नाराज की, शनीची वक्रदृष्टी? त्यामागचे गूढ संकेत काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल