Do You Know : पूर्वीच्या काळी विहिरीचं पाणी गोड कसं लागायचं? हे आहे आजी-आजोबांच्या काळातील शुद्ध पाण्याचे रहस्य
- Published by:Devika Shinde
Last Updated:
त्यावेळी लोक हेच पाणी पिऊन निरोगी राहायचे, ते पाणी खराबही होत नव्हते आणि त्यामुळे कोणतेही रोगही पसरत नव्हते.
advertisement
1/10

आजच्या धावपळीच्या जीवनात पाण्याची शुद्धता हा आपल्यासाठी एक मोठा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे लोक पाणी पिण्यापूर्वी ते उकळून पितात. पण आता यापद्धती बदलल्या आहेत. आता लोक शुद्ध पाणी पिण्यासाठी एकतर दुकानातून ते विकत घेतात किंवा मग RO, UV फिल्टर आणि अनेक महागड्या मशीनवर अवलंबून रहातात.
advertisement
2/10
पण, कधी तुम्ही विचार केला आहे का, की आपल्या आजोबा-पणजोबांच्या काळात गावाकडच्या विहिरींमध्ये कोणतेही फिल्टर नसतानाही, पाणी वर्षानुवर्षे एवढे शुद्ध, थंड आणि गोड कसे राहायचे? तेव्हा तर लोक फक्त गाळून विहिरीचं पाणी प्यायचे, हे कसं शक्य होतं? त्यावेळी लोक हेच पाणी पिऊन निरोगी राहायचे, ते पाणी खराबही होत नव्हते आणि त्यामुळे कोणतेही रोगही पसरत नव्हते.
advertisement
3/10
यामागील रहस्य कोणत्याही जादूत नव्हते, तर ते होते नैसर्गिक आणि वैज्ञानिक विचारसरणीवर आधारित एका साध्या पण प्रभावी पद्धतीत. त्या काळात विहिरींच्या तळाशी दोन साध्या गोष्टी टाकल्या जायच्या, ज्या पाणी शुद्ध आणि आरोग्यदायी ठेवण्यात मोठी भूमिका बजावत होत्या.
advertisement
4/10
1. तांब्याची शक्ती: बॅक्टेरियाचा नैसर्गिक 'शत्रू'जुन्या काळात तांब्याचे भांडे (Copper Utensil) प्रत्येक घरात असायचे आणि पाणी साठवण्यासाठी त्याचा वापर होत असे. याच तांब्याच्या भांड्याचा उपयोग विहिरींमध्येही केला जात असे.
advertisement
5/10
जेव्हा तांबे पाण्याच्या संपर्कात येते, तेव्हा त्याचे आयन (Ions) हळू हळू पाण्यात मिसळतात आणि बॅक्टेरिया, व्हायरस तसेच अनेक प्रकारचे हानिकारक जंतू नष्ट करतात. आजचे आधुनिक विज्ञानही हे मान्य करते की, तांब्याद्वारे होणारे शुद्धीकरण (Copper Purification) ही एक उत्कृष्ट नैसर्गिक पद्धत आहे. यामुळेच, जुन्या विहिरींचे पाणी लवकर खराब होत नव्हते आणि लोक पोटासंबंधी आजारांपासून मोठ्या प्रमाणात सुरक्षित राहायचे.
advertisement
6/10
2. चुनखडी: पाण्याचा pH बॅलन्स करणारा 'फिल्टर'दुसरी महत्त्वाची वस्तू जी विहिरींमध्ये टाकली जायची ती म्हणजे चुनखडी (Limestone) किंवा चुन्याचा दगड. चुनखडीचे काम पाणी शुद्ध करण्यासोबतच त्याला संतुलित ठेवणे हे होते
advertisement
7/10
चुनखडी पाण्याचा pH व्हॅल्यू संतुलित ठेवते. पाणी जास्त आम्लधर्मी असेल तर ते त्याला सामान्य करते आणि जास्त अल्कधर्मी असेल तर त्याला संतुलित करते. चुनखडी पाण्यात असलेला गाळ, मातीचे कण आणि इतर अशुद्धता शोषून घेते आणि त्यांना तळाशी बसवते. त्यामुळे विहिरीच्या वरचे पाणी स्वच्छ आणि पूर्णपणे पारदर्शक राहते.
advertisement
8/10
इतकेच नव्हे तर, चुनखडीत नैसर्गिकरित्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे असतात. ही खनिजे हळू हळू पाण्यात मिसळून पाण्याचे पोषण मूल्य वाढवत असत. याच कारणामुळे, लोक या पाण्याला मिनरल वॉटर न म्हणताही रोज पीत असत आणि त्यांच्या हाडांना नैसर्गिकरित्या बळकटी मिळत असे.
advertisement
9/10
एकूण काय?आज भलेही तंत्रज्ञान खूप पुढे गेले असेल आणि मशीनने आपले काम सोपे केले असेल, पण सत्य हे आहे की आपल्या जुन्या परंपरा आणि देशी तंत्रात खूप खोलवर विज्ञान दडलेले होते. पूर्वी त्याला मोठे 'ब्रँडिंग' दिले जात नसे, पण ते काम मात्र अगदी शांतपणे आणि प्रभावीपणे करत राहायचे.
advertisement
10/10
आपल्या पूर्वजांची ही वैज्ञानिक आणि नैसर्गिक विचारसरणी आपल्याला निसर्गाच्या जवळ राहून आरोग्य कसे जपावे हे शिकवते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/science/
Do You Know : पूर्वीच्या काळी विहिरीचं पाणी गोड कसं लागायचं? हे आहे आजी-आजोबांच्या काळातील शुद्ध पाण्याचे रहस्य