बापरे! तब्बल 34 वर्ष लागली, ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने मोडला 1991 चा एतिहासिक रेकॉर्ड, कुणालाच जमलं नाही
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mitchell Starc historical Ashes record : पर्थ स्टेडियमवर ॲशेस कसोटी क्रिकेट मॅच च्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे.
advertisement
1/6

मिचेल स्टार्कने आपल्या धारदार बॉलिंगने इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडलं आणि पहिल्याच दिवशी इंग्लंडचा डाव अवघ्या 172 धावांत संपुष्टात आला.
advertisement
2/6
मिचेल स्टार्कने 7 विकेट घेत 58 धावा दिल्या, ज्यामुळे इंग्लंडसमोर या 5 मॅचच्या सिरीजमध्ये मोठं आव्हान उभं राहिलं आहे. मिचेल स्टार्कने मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेण्याची आपली खासियत पुन्हा एकदा सिद्ध केली.
advertisement
3/6
विशेष म्हणजे, 24 व्या वेळी स्टार्कने डावाच्या पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजाला बाद करण्याची किमया साधली आहे. ॲशेस कसोटी क्रिकेट मॅचमध्ये मायदेशात 7 विकेट घेणारा मिचेल स्टार्क हा या शतकातील दुसराच ऑस्ट्रेलियन बॉलर ठरला आहे.
advertisement
4/6
याशिवाय, ऑस्ट्रेलियामध्ये ॲशेस कसोटी क्रिकेट मॅचच्या पहिल्याच दिवशी 7 विकेट घेणारा तो 1990–91 ॲशेसमधील क्रेग मॅकडर्मॉटनंतरचा पहिला बॉलर ठरला आहे. McDermott ने वाकावर 8 विकेट घेतल्या होत्या.
advertisement
5/6
इंग्लंडचा 172 धावांचा डाव अवघ्या 197 बॉलमध्ये संपला, जी ऑस्ट्रेलियातील ॲशेस कसोटी क्रिकेट मॅचच्या इतिहासातील तिसरी सर्वात लहान पहिली इनिंग ठरली आहे.
advertisement
6/6
यापूर्वी पर्थ येथे झालेल्या 5 कसोटी क्रिकेट मॅचमध्ये ज्या टीमने प्रथम फलंदाजी केली, त्यांनीच मॅच जिंकला आहे. मात्र, इंग्लंडने या सामनात टॉसनंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना त्याचा मोठा फटका बसला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
बापरे! तब्बल 34 वर्ष लागली, ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने मोडला 1991 चा एतिहासिक रेकॉर्ड, कुणालाच जमलं नाही