Rohit sharma : कर्णधारपद गेलं, आता एक चूक रोहितला महागात पडणार, माजी क्रिकेटपटूच मोठं वक्तव्य
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
रोहित शर्मा आता कर्णधारपदी नसल्याने एक खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे. त्याच्यासोबत विराट कोहलीची देखील निवड झाली आहे.
advertisement
1/6

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये रोहित शर्माकडून वनडेच कर्णधार काढून घेण्यात आलं आहे. त्याच्याजागी शुभमन गिलला वनडेचा नवा कर्णधार बनवलं आहे.
advertisement
2/6
दरम्यान आता कॅप्टन्सी गेल्यानंतर रोहित शर्माला एक चूक महागात पडणार आहे.ही चूक एका माजी क्रिकेटपटूने सांगितली आहे.
advertisement
3/6
आकाश चोप्रा एका व्हिडिओमध्ये म्हणाला, रोहित शर्मा नेहमीच चांगला खेळला आहे. कर्णधार म्हणून त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि अंतिम फेरीत तो सामनावीरही ठरला.
advertisement
4/6
पण जेव्हा तुम्ही कर्णधार असता तेव्हा तुमचे नाव संघाच्या यादीत सर्वात वर असते आणि संघ तुमच्या दृष्टिकोनानुसार तयार होतो.पण जेव्हा तुम्ही फक्त एक खेळाडू असता तेव्हा निवडीचे सर्व निर्णय त्या संदर्भात घेतले जातात.
advertisement
5/6
चोप्रा पुढे म्हणाले,ही अनुभवाची बाब आहे, पण सत्य हे आहे की, जर तुम्ही कर्णधार नसाल तर त्याला 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळताना पाहण्याची कोणतीही हमी नाही. धावा करत राहा, पण जर तुम्ही तसे केले नाही तर तुम्हाला माहिती नाही. हेच वास्तव आहे.
advertisement
6/6
गिल हा भारतीय एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार आहे. तो आधीच कसोटीत कर्णधार आहे, टी२० मध्ये उपकर्णधार आहे आणि आता एकदिवसीय संघातही कर्णधार आहे. भारत सर्व फॉरमॅटसाठी कर्णधार शोधत होता आणि आता ते जवळजवळ निश्चित झाले आहे,असे देखील चोप्रा यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Rohit sharma : कर्णधारपद गेलं, आता एक चूक रोहितला महागात पडणार, माजी क्रिकेटपटूच मोठं वक्तव्य