Arshdeep Singh ने रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा टीम इंडियाचा पहिला बॉलर, 18 वर्षात कुणालाच जमलं नाही
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Arshdeep Singh 100 T20I Wickets : ओमानविरुद्ध अर्शदीप सिंगला नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. अर्शदीप सिंगला फक्त एकच विकेट नावावर केली आहे. तर सूर्याने त्याचा बचाव देखील केला आहे.
advertisement
1/7

आशिया कप स्पर्धेतील ओमानविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय लेफ्ट-आर्म फास्ट बॉल अर्शदीप सिंगने टी-20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
advertisement
2/7
यासह तो टी-20 मध्ये 100 विकेट्स घेणारा पहिला भारतीय बॉल बनला आहे. ओमानच्या डावातील शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने विनायक शुक्लाची विकेट घेत हा रेकॉर्ड नावावर केला.
advertisement
3/7
ओमानविरुद्धची ही मॅच अर्शदीपची 64 वी मॅच होती. या विक्रमासह त्याने भारताचा आघाडीचा स्पिनर युजवेंद्र चहलला मागे टाकले, ज्याच्या नावावर 96 विकेट्स आहेत.
advertisement
4/7
अर्शदीपने 2022 मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि अल्पावधीतच त्याने हा टप्पा गाठला. त्याने टी-20 मॅचमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे, विशेषत: डेथ ओव्हरमध्ये त्याची बॉलिंग प्रभावी ठरली आहे.
advertisement
5/7
अर्शदीप टी-20 मध्ये 100 विकेट्स घेणारा जगातील 25 वा आणि सर्वात वेगवान बॉलर्सपैकी एक आहे. राशिद खान याच्या नावावर टी-ट्वेंटीमध्ये सर्वाधिक विकेट्स आहेत.
advertisement
6/7
सर्वात जलद 100 टी-ट्वेंटी विकेट्स घेणारा बॉलर म्हणून अर्शदीपच्या नावावर रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. याआधी रिझवान बट याच्या नावावर हा रेकॉर्ड होता. तर पाकिस्तानच्या हॅरिस रौफने 69 सामन्यात अशी कामगिरी केली आहे.
advertisement
7/7
दरम्यान, ओमानविरुद्ध अर्शदीप सिंगला नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. अर्शदीप सिंगला फक्त एकच विकेट नावावर केली आहे. तर सूर्याने त्याचा बचाव देखील केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Arshdeep Singh ने रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा टीम इंडियाचा पहिला बॉलर, 18 वर्षात कुणालाच जमलं नाही