TRENDING:

Asia Cup : वैभव-आयुषच्या डोक्यात हवा गेली? पाकिस्तानला ट्रॉफी गिफ्ट दिली, भारताच्या पराभवाचे 5 व्हिलन!

Last Updated:
अंडर-19 आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्ध 191 रननी दारूण पराभव झाला आहे. पाकिस्तानने दिलेल्या 348 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा फक्त 156 रनवर ऑलआऊट झाला.
advertisement
1/6
वैभव-आयुषच्या डोक्यात हवा गेली? पाकिस्तानला ट्रॉफी गिफ्ट दिली, पराभवाचे 5 व्हिलन
याआधी रायजिंग स्टार आशिया कपच्या सेमी फायनलमध्येही टीम इंडियाला बांगलादेशकडून सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा धक्का बसला होता. टीम इंडियाच्या नवोदित खेळाडूंना मोक्याच्या सामन्यांमध्ये अपयश का येत आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
advertisement
2/6
भारताचा पुढचा सुपरस्टार म्हणून अल्पावधीत ओळख मिळवलेला वैभव सूर्यवंशी महत्त्वाच्या सामन्यात पुन्हा फेल गेला. फायनलमध्ये वैभवने 10 बॉलमध्ये 26 रन केले. स्पर्धेमध्ये वैभवने युएईविरुद्ध शतक आणि मलेशियाविरुद्ध अर्धशतक केलं, पण मोठ्या टीमविरुद्ध वैभवची बॅट शांत राहिली.
advertisement
3/6
टीम इंडियाचा कर्णधार आयुष म्हात्रेने स्पर्धेच्या 5 इनिंगमध्ये फक्त 65 रन केले. आयुषचे 5 सामन्यांमधले स्कोअर 4, 38, 14, 7 आणि 2 असे होते. तसंच कॅप्टन्सीमध्येही आयुष म्हात्रेला छाप पाडता आली नाही.
advertisement
4/6
आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाची बॉलिंगही निराशाजनक झाली. 50 ओव्हरमध्ये पाकिस्तानने तब्बल 347 रन केले. खिलान पटेल वगळता प्रत्येक भारतीय बॉलरने 6 पेक्षा जास्तच्या इकोनॉमी रेटने रन दिल्या.
advertisement
5/6
खरंतर फायनलसारखा महत्त्वाचा सामना आणि त्यातच भारत-पाकिस्तान मॅचचा तणाव, अशा परिस्थितीमध्ये पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय अनेकदा योग्य ठरतो. पण या सामन्यात आयुष म्हात्रेने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. टॉस जिंकून पहिले बॉलिंग घ्यायचा अतिआत्मविश्वास टीम इंडियाला महागात पडला.
advertisement
6/6
पाकिस्तानचा ओपनर समीर मिन्हासने या सामन्यात 113 बॉलमध्ये 172 रनची खेळी केली. त्याच्या या इनिंगमध्ये 17 फोर आणि 9 सिक्सचा समावेश होता. समीर मिन्हास भारतीय बॉलिंगवर आक्रमण करत होता, पण त्याला रोखण्यासाठीचा कोणताही प्लान बी टीम इंडियाकडे दिसला नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Asia Cup : वैभव-आयुषच्या डोक्यात हवा गेली? पाकिस्तानला ट्रॉफी गिफ्ट दिली, भारताच्या पराभवाचे 5 व्हिलन!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल