T20 World Cup मध्ये नवा ट्विस्ट! 19 दिवस शिल्लक असताना बांगलादेशने शोधली चोरवाट, क्रिकेटच्या इतिहासात असं कधीच झालं नाही
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Bangladesh asked icc to swap t20 world cup 2026 group : बांगलादेशने आयर्लंडच्या जागी आपल्याला सामावून घेण्याची विनंती केली असून, जेणेकरून त्यांना आपल्या सर्व मॅचेस श्रीलंकेत खेळता येतील.
advertisement
1/7

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 या स्पर्धेचे वेळापत्रक आता समोर आले असून क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये संयुक्तपणे खेळवली जाणार आहे.
advertisement
2/7
पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कप आधी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) एकच खळबळ माजवून दिली आहे. सुरुवातीला बांगलादेशने भारतात मॅचेस खेळण्यास नकार दिला होता.
advertisement
3/7
मात्र, आता बांगलादेशने नवी मागणी आयसीसीसमोर ठेवली आहे, जे आत्तापर्यंत टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये कधीच झालं नाही. थेट आपला ग्रुप बदलण्याची मागणी आयसीसीकडे (ICC) केली आहे.
advertisement
4/7
बांगलादेशने आयर्लंडच्या जागी आपल्याला सामावून घेण्याची विनंती केली असून, जेणेकरून त्यांना आपल्या सर्व मॅचेस श्रीलंकेत खेळता येतील. रिपोर्टनुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्ड सुरक्षा कारणास्तव भारतात येऊन खेळण्यास तयार नाही.
advertisement
5/7
टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये बांगलादेशचा समावेश ग्रुप सी मध्ये असून, त्यांच्या मॅचेस कोलकाता आणि मुंबईत होणार आहेत. दुसरीकडे आयर्लंडचा संघ ग्रुप बी मध्ये असून त्यांच्या सर्व मॅचेस श्रीलंकेत नियोजित आहेत.
advertisement
6/7
बांगलादेशला भारताऐवजी श्रीलंकेत खेळायचे असल्याने त्यांनी हा अजब प्रस्ताव आयसीसीसमोर ठेवला आहे. या सर्व प्रकारावर क्रिकेट आयर्लंडने आपली भूमिका स्पष्ट केली असून, आयसीसी त्यांना श्रीलंकेतून बाहेर हलवणार नाही, असं आश्वासन मिळाल्याचं सांगितलंय.
advertisement
7/7
दरम्यान, आयर्लंड आपले पहिले 3 सामने कोलंबोमध्ये आणि शेवटचा सामना पालेकेले येथे खेळणार आहे. आयर्लंडच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मूळ वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नाही आणि आम्ही ठरल्यानुसार श्रीलंकेतच आमचे ग्रुप स्टेजचे सामने खेळवू.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup मध्ये नवा ट्विस्ट! 19 दिवस शिल्लक असताना बांगलादेशने शोधली चोरवाट, क्रिकेटच्या इतिहासात असं कधीच झालं नाही