नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोलीतील एका नामांकित सोसायटीत राहणारे ६६ वर्षीय तक्रारदार ज्येष्ठ नागरिक शुक्रवारी (१६ जानेवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सोसायटीच्या परिसरातून फिरत होते. त्यावेळी त्यांना सोसायटीच्या आवारात एक तरुण आणि त्याची मैत्रीण अश्लील चाळे करताना दिसले. सार्वजनिक ठिकाणी आणि सोसायटीच्या परिसरात असे वागणे चुकीचे असल्याने, ज्येष्ठ नागरिकानी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.
advertisement
"सोसायटीच्या परिसरात असे अश्लील प्रकार करू नका," असे सांगताच आरोपी तरुण संतापला. त्याने ज्येष्ठ नागरिकाचे ऐकून घेण्याऐवजी त्यांच्याशी वाद घातला. वादाचे रूपांतर पुढे शिवीगाळ आणि मारहाणीत झाले. तरुणाने रागाच्या भरात ज्येष्ठाला धक्काबुक्की केली.
या घटनेनंतर पीडित ज्येष्ठ नागरिकाने तातडीने वाघोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेतला जात आहे. सोसायटीच्या सुरक्षिततेच्या आणि शिस्तीच्या प्रश्नावरून वाघोली परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
