Pune Crime: पिंपरीत संपत्तीचा वाद विकोपाला! मध्यरात्री सावत्र भाऊ बाटलीत पेट्रोल घेऊन आला अन्.. धक्कादायक कांड
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
आकाश बारणे आणि त्यांच्या सावत्र भावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद सुरू आहे. याच वादातून काल त्यांच्यात पुन्हा एकदा बाचाबाची झाली.
पुणे : पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथे संपत्तीच्या वादातून एका सावत्र भावाने चक्क आपल्याच भावाची कार पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश बारणे आणि त्यांच्या सावत्र भावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद सुरू आहे. याच वादातून काल त्यांच्यात पुन्हा एकदा बाचाबाची झाली. या भांडणाचा राग मनात धरून, सावत्र भावाने मध्यरात्री एकच्या सुमारास बाटलीत पेट्रोल आणले आणि गल्लीत उभ्या असलेल्या आकाश बारणे यांच्या कारवर पेट्रोल ओतलं. यानंतर त्याने भावाची कारची पेटवली. मध्यरात्रीच्या शांततेत अचानक कारने पेट घेतल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
advertisement
याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बहिरट यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादातून घडला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल.
एकतर्फी प्रेमातून तरुणीला मारहाण
पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरातूनही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एकतर्फी प्रेमातून एका १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला मारहाण आणि विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव समीर अकबर हाश्मी (वय २५, रा. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर) असे आहे. फिर्यादी तरुणी एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून, आरोपी समीर हा गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. त्याने अनेकदा तरुणीचा पाठलाग करून तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 10:57 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: पिंपरीत संपत्तीचा वाद विकोपाला! मध्यरात्री सावत्र भाऊ बाटलीत पेट्रोल घेऊन आला अन्.. धक्कादायक कांड








