Weekly Numerology: 5, 6, 7, 8 आणि 9 मूलांकाचे साप्ताहिक अंकशास्त्र! जानेवारीच्या मध्यात भाग्याची साथ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology 19 to 25 January 2026: या आठवड्यातील अंकशास्त्रानुसार काही मूलांकाना नशीबाची साथ मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. या आठवड्यात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. काहींना करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधी त्यांच्या वाट पाहत आहेत. तुम्ही जे काही हाती घ्याल त्यात यश मिळेल, परंतु आर्थिक नुकसान होण्याचा धोका आहे. या आठवड्यातील अंकशास्त्रीय कुंडली सविस्तर जाणून घेऊ.
अंक 5 (कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेले लोक) रिकाम्या वेळी घरात बसून कंटाळा करण्यापेक्षा तुमच्या छंदांना वेळ द्या, यामुळे तुम्हाला मानसिक ऊर्जा मिळेल. कुटुंबातील शुभ कार्यामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे थोडे मानसिक दडपण येईल. करिअरच्या दृष्टीने हा काळ खूप शुभ आहे, तुम्हाला मनासारखे फळ मिळेल. ध्येयाप्रती प्रामाणिक राहा, अन्यथा मागील मेहनत वाया जाऊ शकते. कोणताही निर्णय घेताना भविष्याचा विचार नक्की करा.
advertisement
अंक 6 (कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेले लोक) वृद्धांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. सकाळी फिरणे आणि धूळ असलेल्या ठिकाणांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा, अन्यथा दंड भरावा लागू शकतो. उशिरापर्यंत घराबाहेर राहणे किंवा चैनीच्या वस्तूंवर खर्च केल्याने पालकांचा राग ओढवून घेऊ शकता. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे तुमच्या कार्यपद्धतीमध्ये योग्य तो बदल करा.
advertisement
अंक 7 (कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेले लोक) आर्थिक व्यवहारात विचारपूर्वक पाऊल टाका. इतरांच्या मागण्या पूर्ण करताना तुमची भविष्यातील पुंजी खर्च करू नका. नाही म्हणायला शिकणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. घरात काही बदल करायचे असतील तर इतरांचे मत नक्की घ्या. करिअरबद्दलच्या संभ्रमामुळे ऑफिसच्या कामात मन लागणार नाही. मन शांत ठेवण्यासाठी योग आणि ध्यानाचा आधार घ्या. विद्यार्थ्यांनी आळस सोडून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
advertisement
अंक 8 (कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेले लोक) घरातील व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे तुमचे मानसिक दडपण कमी होईल. आर्थिक बाबतीत कुटुंबियांची साथ मिळाल्याने बचत करणे सोपे जाईल. वडिलांना कार्यक्षेत्रात पदोन्नती मिळण्याचे योग आहेत, ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. व्यावसायिकांना समाधानकारक निकाल मिळतील आणि नोकरी करणाऱ्यांना महत्त्वाची जबाबदारी मिळेल. विद्यार्थी असाल तर निकालाची चांगली बातमी मिळू शकते.
advertisement
अंक 9 (कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेले लोक) आरोग्य चांगले राहील, पण अतिविचार केल्याने मानसिक ताण येऊ शकतो. आर्थिक बाबतीत लक्ष्मीची कृपा राहील, ज्यामुळे कमी मेहनतीत चांगले पैसे कमवाल. चुकीचे आर्थिक निर्णय घेणे टाळा. कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या तुम्ही चोख पार पाडाल. समाजात किंवा कामाच्या ठिकाणी गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. स्वतःचे ज्ञान वाढवण्यासाठी नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्या.







