Thane News : पतीच्या अनुपस्थितीत घरात घडलं भयंकर; ठाण्यात भरदिवसा अज्ञातांनी साधली संधी
Last Updated:
Thane Theft News : ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. श्रीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
ठाणे : ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. वंदना खरात (वय 47) यांच्या घरातून चोरट्यांनी एकूण 84 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.
वंदना खरात या घरकाम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे पती पेंटिंगचे काम करतात. 6 जानेवारी रोजी नातेवाइकाच्या निधनामुळे त्यांचे पती अहिल्यानगर येथे गेले होते. त्यामुळे त्या काही दिवस घरात एकट्याच होत्या. 8 जानेवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता वंदना नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडल्या. त्यानंतर त्यांची दोन्ही मुले सकाळी साडेनऊच्या सुमारास शाळा आणि इतर कामांसाठी घराबाहेर गेली.
advertisement
घर बंद असल्याचे पाहून अज्ञातांनी संधी साधली
घर दिवसभर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दुपारच्या सुमारास विठ्ठल निवास या इमारतीमधील त्यांच्या घराचे कुलूप हत्याराच्या साहाय्याने तोडले. घरात प्रवेश करून चोरट्यांनी 20 हजार रुपयांची सोनसाखळी आणि 61 हजार 500 रुपयांचे सोन्याचे पेंडल चोरून नेले.
दुपारी अडीच वाजता वंदना घरी परतल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. घर पूर्ण पाहिले असता कपाटातील दागिने गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 10:45 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Thane News : पतीच्या अनुपस्थितीत घरात घडलं भयंकर; ठाण्यात भरदिवसा अज्ञातांनी साधली संधी










