अरे बापरे! वयाच्या पस्तीशीपर्यंत 'या' मूलांकाच्या लोकांना करावे लागतात खूप कष्ट, मग शनीच्या कृपेने चमकत नशीब; हवं ते मिळतं
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
अंकशास्त्रानुसार, प्रत्येक मूलांकावर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा प्रभाव असतो. काही लोक जन्मतःच नशीब घेऊन येतात, तर काहींना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो.
advertisement
1/7

अंकशास्त्रानुसार, प्रत्येक मूलांकावर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा प्रभाव असतो. काही लोक जन्मतःच नशीब घेऊन येतात, तर काहींना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. अंकशास्त्रात 'मूलांक 8' बद्दल असे म्हटले जाते की, हे लोक वयाच्या 35 व्या वर्षापर्यंत प्रचंड संघर्षातून जातात, पण त्यानंतर शनीच्या आशीर्वादाने ते असा इतिहास रचतात की जग पाहत राहते.
advertisement
2/7
संघर्षातून यशाकडे : वयाच्या 18 ते 35 वर्षांपर्यंत या जातकांना करिअर, आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक आघाड्यांवर अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. अनेकदा यश अगदी जवळ येऊन निसटते, पण हे लोक हार मानत नाहीत.
advertisement
3/7
35 व्या वर्षी भाग्योदय : अंकशास्त्रानुसार, वयाचे 35 वे वर्ष या जातकांसाठी 'टर्निंग पॉईंट' ठरते. या वयानंतर शनीची कृपा त्यांच्यावर सुरू होते आणि त्यांच्या कष्टाचे चीज होऊन त्यांना अमाप यश, संपत्ती आणि प्रसिद्धी मिळते.
advertisement
4/7
शनीचे वरदान आणि इतिहास: हे लोक शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद ठेवतात. एकदा का यांचा यशाचा काळ सुरू झाला की, ते मागे वळून पाहत नाहीत.
advertisement
5/7
शिस्त आणि संयम: शनीच्या प्रभावामुळे हे लोक अत्यंत शिस्तप्रिय आणि संयमी असतात. ते बोलण्यापेक्षा कामावर जास्त विश्वास ठेवतात. कठीण काळातही ते आपला संयम ढळू देत नाहीत, हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.
advertisement
6/7
आर्थिक समृद्धी: सुरुवातीच्या काळात पैशांची चणचण भासली तरी, आयुष्याच्या उत्तरार्धात या लोकांपाशी प्रचंड संपत्ती असते. ते अतिशय विचारपूर्वक गुंतवणूक करतात आणि भविष्यासाठी मोठी तरतूद करून ठेवतात.
advertisement
7/7
रहस्यमयी व्यक्तिमत्व: मूलांक 8 चे लोक सहजासहजी आपल्या मनातील विचार कोणापाशी बोलून दाखवत नाहीत. ते दिसायला गंभीर असले तरी आतून अत्यंत दयाळू आणि मदतीला तत्पर असतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
अरे बापरे! वयाच्या पस्तीशीपर्यंत 'या' मूलांकाच्या लोकांना करावे लागतात खूप कष्ट, मग शनीच्या कृपेने चमकत नशीब; हवं ते मिळतं