IND vs NZ : 'त्याच्यासाठी टीम इंडियाचे दार बंद करू नका', इरफान पठाणची आगरकरला वॉर्निंग
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
न्यूझीलंड विरूद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा घोषणा करण्यात आली आहे.या संघातून अनेक भारतीच खेळाडूंचा चांगल्या कामगिरीनंतर देखील पत्ता कट करण्यात आला आहे.
advertisement
1/9

न्यूझीलंड विरूद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा घोषणा करण्यात आली आहे.या संघातून अनेक भारतीच खेळाडूंचा चांगल्या कामगिरीनंतर देखील पत्ता कट करण्यात आला आहे.
advertisement
2/9
या खेळाडूंमध्ये मोहम्मद शमीच देखील नाव आहे.शमीला डावलल्यानंतर निवड समितीवर प्रचंड टीका होत आहे. मोहम्मद शमीवर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया बंगालचे कोच लक्ष्मी रतन शुक्ला यांनी दिली होती.त्यानंतर आता इरफान पठाण निवड समितीवर भडकला आहे.
advertisement
3/9
खरं तर मार्च 2025 मध्ये शमीने चम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना भारतासाठी शेवटचा खेळता होता.या सामन्यानंतर आता जवळजवळ 9 महिने उलटले आहेत. या दरम्यान त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून देखील त्याची निवड झाली नाही.
advertisement
4/9
मोहम्मद शमीने रणजी ट्रॉफी स्पर्धेतील 4 सामन्यात 20 विकेट घेतल्या होत्या. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या 7 सामन्यात 16 विकेट्स आणि सध्या चालु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या 4 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या आहेत.
advertisement
5/9
मोहम्मद शमी काय काल आलेला खेळाडू नाही आहे.त्याने 450-500 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत.जेव्हा तुम्ही 400 पेक्षा जास्त विकेट्स घेता आणि त्यानंतर तुम्हाला संघातून वगळले जाते, आणि तुमच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, तेव्हा असे प्रत्येकासोबत घडते. जोपर्यंत तुम्ही क्रिकेट खेळता, तोपर्यंत तुम्हाला स्वतःला सिद्ध करत राहावे लागते,असे इरफान पठाणने युट्यूबवर सांगितलं आहे.
advertisement
6/9
इरफानने शमीच्या फिटनेसवरील प्रश्नावरही उत्तर दिले आहे. शमीने आधीच 200 ओव्हर गोलंदाजी केली आहे. 200 ओव्हर गोलंदाजी केल्यानंतरही जर फिटनेस हा प्रश्न असेल, तर त्याने ते आधीच सिद्ध केले आहे. आणखी कोणत्या सुधारणेची गरज आहे? निवड समिती काय विचार करत आहे, हे फक्त त्यांनाच माहीत आहे, अशा शब्दात त्याने निवड समितीला घेरलं.
advertisement
7/9
जर मी त्याच्या जागी असतो, तर मी जाऊन आयपीएल खेळलो असतो आणि धुमाकूळ घातला असता.देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीवर चर्चा होते, पण जेव्हा आयपीएल येते आणि तुम्ही तुमचा जुना लय आणि फिटनेस दाखवता, तेव्हा कोणीही तुमच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. संपूर्ण जग आयपीएल पाहते. जर तुम्ही तिथे चांगली कामगिरी केली, तर तुम्ही संघात पुन्हा आपले स्थान निर्माण करता, असे इरफान पठाण शमीला सल्ला देतो.
advertisement
8/9
पुढे निवड समितीला उद्देशून इरफान सांगतो,मला वाटते की त्याचे दरवाजे बंद केले जाऊ नयेत. एकंदरीत इरफान पठाण निवड समितीला शमी परतण्याची संधी देण्याची मागणी करत आहे. या मागणीवर निवड समिती काय विचार करते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
9/9
भारताचा एकदिवसीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, के एल राहुल (विकेटकिपर), श्रेयस अय्यर (उप कर्णधार), वॉशिग्टन सुंदर, रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, रिषभ पंत (विकेटकिपर) नितीश कुमार रेड्डी, अर्शदिप सिंह, यशस्वी जयस्वाल
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : 'त्याच्यासाठी टीम इंडियाचे दार बंद करू नका', इरफान पठाणची आगरकरला वॉर्निंग