IND vs PAK : हार्दिक पांड्याच्या आयुष्यात पुन्हा 'लेडी लक', स्टेडियमवर दिसलेली मिस्ट्री गर्ल कोण?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Hardik Pandya rumoured Girlfriend Jasmin Walia : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुबईत सुरू असलेल्या सामन्यात हार्दिक पांड्याची कथित गर्लफ्रेंड स्टेडियममध्ये दिसून आली. त्यामुळे आता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
advertisement
1/7

टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या याने 12 जुलै 2024 रोजी मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकसोबत घटस्फोटाची घोषणा केली होती. त्यानंतर पांड्या एकाकी पडल्याचं दिसत होतं.
advertisement
2/7
घटस्फोटानंतर हार्दिक एका गायिकेला डेट करत असल्याची चर्चा देखील झाली होती. दोघांचे काही फोटो व्हायरल होत होते, ज्यात बॅकग्राऊंड एकसारखेच दिसत होते.
advertisement
3/7
त्यामुळे हार्दिक पांड्या रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जात बोललं जात होतं. ही गायिका दुसरी तिसरी कुणी नसून जॅस्मिन वालिया आहे. जॅस्मिन वालियासोबत पांड्या डेट करत असल्याचं समोर आलं होतं.
advertisement
4/7
अशातच आता जॅस्मिन वालिया भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुबईत सुरू असलेली मॅच पाहण्यासाठी पोहोचली आहे. स्टेडियममध्ये पांड्याला चिअर्स करताना जॅस्मिन वालिया दिसली.
advertisement
5/7
सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाल्यानंतर हार्दिक आणि जॅस्मिनच्या डेटिंगच्या अफवा आणखीनच वाढल्या होत्या. आता जॅस्मिनने स्टेडियमवर हजेरी लावून नात्यावर शिक्कामोर्तब केलंय का? असा सवाल विचारला जातोय.
advertisement
6/7
जॅस्मिन वालिया ही एक ब्रिटिश गायिका आणि टेलिव्हिजन व्यक्तिमत्व आहे. ती म्युझिक इंडस्ट्री आणि सोशल मीडिया या दोन्ही ठिकाणी लोकप्रिय आहे.
advertisement
7/7
दरम्यान, जॅस्मिनने प्रथम ब्रिटीश रिॲलिटी टीव्ही मालिका, द ओन्ली वे इज एसेक्समध्ये झळकल्यानंतर प्रकाशझोतात आली. एका प्रसिद्ध रिॲलिटी शोमधील अभिनयामुळे तिला मनोरंजन क्षेत्रात खूप नाव आणि प्रसिद्धी मिळाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : हार्दिक पांड्याच्या आयुष्यात पुन्हा 'लेडी लक', स्टेडियमवर दिसलेली मिस्ट्री गर्ल कोण?