IND vs NZ ODI : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून डच्चू, शुभमन गिलने दोन वाक्यात विषय संपवला! म्हणाला 'सिलेक्टर्सला जर...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IND vs NZ 1st ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. अशातच आता शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार आहे. त्याआधी शुभमन गिलने प्रेस कॉन्फरेन्स घेतली.
advertisement
1/5

टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय टीमची घोषणा झाल्यानंतर त्यात शुभमन गिलचे नाव नसल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या निवडीनंतर शुभमनने आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली.
advertisement
2/5
"मी निवडकर्त्यांच्या निर्णयाचा सन्मान करतो आणि वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा," असे गिलने रिव्हस्पोर्ट्सशी बोलताना सांगितले. स्वतः टीममध्ये नसूनही त्याने दाखवलेली ही खिलाडूवृत्ती चाहत्यांना भावली आहे.
advertisement
3/5
निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट केले की, गिल हा एक दर्जेदार खेळाडू असला तरी सध्याच्या घडीला टीमच्या कॉम्बिनेशनसाठी त्याला वगळणे भाग होते. टी२० फॉरमॅटमध्ये भारताला टॉप ऑर्डरमध्ये एका विकेटकीपरची गरज होती.
advertisement
4/5
ज्यामुळे इशान किशनला संधी देण्यात आली. गेल्या काही सामन्यांतील शुभमनचा फॉर्म देखील चिंतेचा विषय ठरला होता, ज्याचा विचार निवड प्रक्रियेत करण्यात आला. मात्र, गिलने या सर्व गोष्टी सकारात्मकतेने घेतल्या आहेत.
advertisement
5/5
शुभमन गिल सध्या भारतीय टेस्ट आणि वनडे टीमचा कॅप्टन असून टी-20 मध्ये तो उपकॅप्टन होता. वर्ल्ड कपमधून त्याला वगळण्यात आल्यानंतर आता त्याच्या जागी अक्षर पटेलकडे उपकॅप्टन पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ ODI : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून डच्चू, शुभमन गिलने दोन वाक्यात विषय संपवला! म्हणाला 'सिलेक्टर्सला जर...'