TRENDING:

2026 चा शेवट ठरणार डोकेदुखी! राहू-केतूमुळे 'या' राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथापालथ, वाचा तुमच्या राशीचे हाल

Last Updated:
5 डिसेंबर 2026 रोजी राहू मकर राशीत आणि केतू कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. काही राशींना राजयोग, तर काहींना सावधगिरीची गरज आहे. बदल 18 महिन्यांसाठी असेल.
advertisement
1/13
2026 चा शेवट ठरणार डोकेदुखी, राहू-केतूमुळे 'या' राशींच्या लोकांचे होणार हाल
ज्योतिषशास्त्रामध्ये राहू आणि केतू या दोन ग्रहांना 'छाया ग्रह' आणि 'मायावी ग्रह' मानले जाते. हे ग्रह जेव्हा आपली रास बदलतात, तेव्हा मानवी जीवनात अचानक आणि मोठे बदल घडून येतात. 2026 या वर्षाच्या अखेरीस, 5 डिसेंबर 2026 रोजी राहू आणि केतू आपली रास बदलणार आहेत. राहू कुंभ राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करेल, तर केतू सिंह राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. हा बदल सुमारे 18 महिन्यांसाठी असेल. काही राशींसाठी हा काळ 'राजयोग' ठरेल, तर काहींना सावध राहण्याची गरज आहे.
advertisement
2/13
मेष (Aries): राहू तुमच्या 10 व्या भावात येणार आहे. करिअरमध्ये मोठे बदल होतील. कामाचा ताण वाढेल, पण प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. घरापासून दूर जावे लागू शकते.
advertisement
3/13
वृषभ (Taurus): 9 व्या भावात राहू आणि तिसऱ्या भावात केतू असल्याने भाग्याची साथ मिळेल. अचानक धनलाभाचे योग आहेत. भावंडांशी असलेले संबंध मात्र थोडे तणावपूर्ण राहू शकतात.
advertisement
4/13
मिथुन (Gemini): 8 व्या भावात राहू असल्याने आरोग्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागेल. गुंतवणुकीत जोखीम पत्करू नका. मात्र, संशोधक आणि गुढ शास्त्रात रस असणाऱ्यांना यश मिळेल.
advertisement
5/13
कर्क (Cancer): केतू तुमच्याच राशीत आणि राहू 7 व्या भावात असल्याने वैवाहिक जीवनात चढ-उतार येतील. जोडीदारासोबत गैरसमज टाळा. स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो.
advertisement
6/13
सिंह (Leo): 6 व्या भावात राहू शत्रूंवर विजय मिळवून देईल. जुन्या आजारातून सुटका होईल. नोकरीत तुमचे वर्चस्व वाढेल, पण अनावश्यक प्रवासाने थकवा जाणवेल.
advertisement
7/13
कन्या (Virgo): 5 व्या भावात राहू विद्यार्थ्यांसाठी संमिश्र ठरेल. प्रेमसंबंधात फसवणूक होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.
advertisement
8/13
तूळ (Libra): चौथ्या भावात राहू असल्याने घर किंवा मालमत्तेशी संबंधित वादाला सामोरे जावे लागू शकते. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. मात्र, करिअरमध्ये स्थैर्य लाभेल.
advertisement
9/13
वृश्चिक (Scorpio): तिसऱ्या भावात राहू तुमच्या धैर्यात वाढ करेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. संवाद कौशल्य सुधारेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील.
advertisement
10/13
धनु (Sagittarius): दुसऱ्या भावात राहू असल्याने आर्थिक बाबतीत सावध राहा. वाणीवर नियंत्रण ठेवा, अन्यथा कुटुंबात वाद होऊ शकतात. डोळ्यांच्या तक्रारी जाणवू शकतात.
advertisement
11/13
मकर (Capricorn): तुमच्याच राशीत राहूचा प्रवेश होत असल्याने तुम्ही खूप महत्त्वाकांक्षी व्हाल. वेगाने निर्णय घ्याल, पण ते घेताना घाई करू नका. डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
advertisement
12/13
कुंभ (Aquarius): राहू आता तुमच्या राशीतून बाहेर पडून 12 व्या भावात जाणार आहे. परदेश गमनाचे स्वप्न पूर्ण होईल. मात्र, विनाकारण खर्च वाढल्याने बजेट कोलमडू शकते.
advertisement
13/13
मीन (Pisces): 11 व्या भावात राहू आल्याने तुमच्यासाठी हा काळ सुवर्णकाळासारखा असेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. अडकलेले पैसे परत मिळतील आणि रखडलेली कामे पूर्ण होतील. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
2026 चा शेवट ठरणार डोकेदुखी! राहू-केतूमुळे 'या' राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथापालथ, वाचा तुमच्या राशीचे हाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल