TRENDING:

T20 World Cup आधी फक्त 10 मॅच, सूर्याने धमाका केला, गंभीरच्या दोन्ही फेवरेटना डगआऊटमध्ये बसवलं!

Last Updated:
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला सुरूवात झाली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारतात टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे, त्याआधी टीम इंडिया फक्त 10 सामने खेळणार आहे, त्यामुळे भारतासाठी ही सीरिज महत्त्वाची आहे.
advertisement
1/7
T20 World Cup आधी फक्त 10 मॅच, सूर्याने धमाका केला, गंभीरचे दोन्ही फेवरेट बाहेर!
7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान भारत आणि श्रीलंकेमध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. या वर्ल्ड कपआधी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 आणि न्यूझीलंडविरुद्ध 5 टी-20 मॅचची सीरिज खेळेल. या दोन्ही सीरिजमध्ये खेळणारे खेळाडूच टी-20 वर्ल्ड कपमध्ये दिसतील.
advertisement
2/7
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या यांचं टीम इंडियात कमबॅक झालं आहे. आशिया कपच्या फायनलआधी हार्दिकला दुखापत झाली होती, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजवेळी मानेच्या दुखापतीमुळे गिल टेस्ट आणि वनडे सीरिज खेळू शकला नव्हता.
advertisement
3/7
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी ज्या 15 खेळाडूंची टीम इंडियात निवड झाली आहे, त्यांनाच टी-20 वर्ल्ड कपचं तिकीट मिळेल, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यातल्या प्लेइंग इलेव्हनमुळे वर्ल्ड कपची प्लेइंग इलेव्हनही निश्चित झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
advertisement
4/7
भारताची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग
advertisement
5/7
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 साठी कर्णधार सूर्यकुमार यादवने चार खेळाडूंना बेंचवर बसवलं आहे, ज्यात संजू सॅमसन, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे.
advertisement
6/7
मागच्या काही काळामध्ये हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना टीम इंडियाकडून तिन्ही फॉरमॅट खेळण्याची संधी मिळाली आहे. तसंच दोन्ही खेळाडूंना गंभीरने कायमच पाठिंबा दिला आहे.
advertisement
7/7
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट आणि वनडे सीरिजमध्ये वॉशिंग्टन सुंदरची कामगिरी निराशाजनक झाली, त्यामुळे त्याला पहिल्या टी-20 मध्ये बेंचवर बसवण्यात आलं आहे. तर हार्दिक पांड्याचं कमबॅक झाल्यामुळे हर्षित राणालाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup आधी फक्त 10 मॅच, सूर्याने धमाका केला, गंभीरच्या दोन्ही फेवरेटना डगआऊटमध्ये बसवलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल