TRENDING:

IND vs SA : आफ्रिकेविरूद्धचा सामना 24 तासांवर, टीम इंडियाच्या निम्म्या खेळाडूंची प्रॅक्टीसला दांडी, अतिआत्मविश्वास नडणार?

Last Updated:
भारताच्या सुपर 8 मधील साऊथ आफ्रिकेविरूद्धच्या सामन्याला 24 तास उरले असताना टीम इंडियाच्या गोटातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
advertisement
1/10
आफ्रिकेविरूद्धचा सामना 24 तासांवर, टीम इंडियाच्या निम्म्या खेळाडूंची प्रॅक्टीसल
सूपर 8 मध्ये टीम इंडिया आपला पहिला सामना हा साऊथ आफ्रिकेविरूद्ध खेळणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअर उद्या रविवारी 22 फेब्रुवारी 2026 ला संध्याकाळी खेळवला जाणार आहे.
advertisement
2/10
खरं तर प्रत्येक संघाला सुपर 8 मध्ये तीन सामने खेळायचे आहे. या तीनपैकी दोन सामने जिंकणारा संघ सेमी फायनलमध्ये जाणार आहेत.
advertisement
3/10
वर्ल्डकपच्या दृष्टीकोनातून हे खूपच महत्वाचे सामने असणार आहेत.त्यामुळे प्रत्येक संघ हे तीन पैकी तीन सामने जिंकण्यावर भर देणार आहे.
advertisement
4/10
दरम्यान आता भारताच्या सुपर 8 मधील साऊथ आफ्रिकेविरूद्धच्या सामन्याला 24 तास उरले असताना टीम इंडियाच्या गोटातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
advertisement
5/10
टीम इंडियाच्या प्रॅक्टीस सेशनला अभिषेक शर्मासह सात खेळाडूंनी दांडी मारल्याची माहिती समोर आली आहे. आणि फक्त 4 खेळाडू सरावाला हजर होते, अशी क्रिकेट सुत्रांकडून माहिती समोर येते आहे. त्यामुळे टीम इंडियाला खरंच वर्ल्ड कपला घेऊन सिरीयस आहे ना, असा सवाल आता उपस्थित होतं.
advertisement
6/10
प्रॅक्टीस सेशनला रिंकु सिंह आणि ईशान किशन हे फलंदाज उपस्थित होते, त्यांच्यासोबत कुलदीप यादव देखील गोलंदाजीची प्रॅक्टीस करत होता. आणि टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव देखील मैदानात उपस्थित होता,पण तो प्रॅक्टीस करत नव्हता.
advertisement
7/10
क्टीस सेशनला रिंकु सिंह आणि ईशान किशन हे फलंदाज उपस्थित होते, त्यांच्यासोबत कुलदीप यादव देखील गोलंदाजीची प्रॅक्टीस करत होता. आणि टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव देखील मैदानात उपस्थित होता,पण तो प्रॅक्टीस करत नव्हता.
advertisement
8/10
तर टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्मा मागच्या तीन सामन्यांपासून भोपळाही फोडू शकला नाही आहे. तिलक वर्मा देखील पाकिस्तानविरूद्ध खेळताना अडखळता दिसला होता.या दोघांसह इतर पाच खेळाडूंनी प्रॅक्टीस सेशनला दांडी मारली होती.
advertisement
9/10
दरम्यान सूपर 8 सारखे सामने तोंडावर असताना निम्मी टीम इंडिया प्रॅक्टीस सेशनला उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.तसेच टीम इंडियाला हा अतिआत्मविश्वास महागात पडू शकतो,असेही बोलले जात आहे.
advertisement
10/10
पण अशीही माहिती मिळते आहे की हा ऑप्शनल प्रॅक्टीस सेशन होता. याचा अर्थ खेळाडूंना प्रॅक्टीस सेशनला येण्याचं असं काही बंधन नाही आहे पण खेळाडू आपल्या इच्छेनुसार सहभागी होऊ शकतात. त्यामुळे निम्म्या खेळाडूंनी दांडी मारल्याचे समजते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : आफ्रिकेविरूद्धचा सामना 24 तासांवर, टीम इंडियाच्या निम्म्या खेळाडूंची प्रॅक्टीसला दांडी, अतिआत्मविश्वास नडणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल